Menu Close

भावनगर (गुजरात) येथे धर्मांधांकडून विश्‍व हिंदु परिषदेच्या शाखा अध्यक्षाची हत्या

  • हिंदु नेत्यांच्या हत्या, हिंदूंवरील अत्याचार जसे काँग्रेसच्या राजवटीत नित्य होत होते आणि काँग्रेस त्याकडे निमूटपणे पहात होती, तशीच परिस्थिती भाजपच्या राजवटीत पहावयास मिळत आहे ! ‘हिंदूंच्या मतांवर सत्तेत येऊन हिंदूंचेच रक्षण न करणार्‍या पक्षाला आता हिंदूंनी तरी पुन्हा सत्तेवर का बसवावे ?’, असा प्रश्‍न हिंदूंना पडल्यास नवल ते काय ?
  • हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्यांविषयी एकीकडे प्रसारमाध्यमे एका ओळीचीही बातमी देत नाहीत, तर दुसरीकडे सरकारही या हत्या रोखू शकत नाही कि धर्मांधांवर कारवाई करत नाही ! यावरून ‘या देशात १०० कोटी हिंदू असूनही आजची लोकशाही व्यवस्था त्यांचे रक्षण करू शकत नाही’, हेच सिद्ध होते. हिंदूबहुल राष्ट्रात हिंदूंनी ही गळचेपी आणि हा अन्याय कुठवर सहन करायचा ? यास्तव हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

भावनगर (गुजरात) : येथील महुआ येथे रहाणारे विश्‍व हिंदु परिषदेचे नेते जयेश गुजरीया (वय २२ वर्षे) यांच्यावर धर्मांधांनी तलवारीने आक्रमण करून त्यांची हत्या केली. (भाजप सरकारला याहून लज्जास्पद आणखी काय असू शकेल ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी पोलिसांनी असलम, इमरान, बापुडी मियाँ तसेच अन्य एक जण अशा ४ धर्मांधांना अटक केली आहे. विहिंपने गुजरीया यांची नुकतीच महुआ शाखा अध्यक्षपदी निवड केली होती. ते या भागातील प्रसिद्ध गोरक्षक होते. (जमावाने गोमांसभक्षकांची हत्या केल्यावर आकाश-पाताळ एक करणारे निधर्मी हे धर्मांधांनी गोरक्षकाची हत्या केल्यावर गप्प बसतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

प्राप्त माहितीनुसार २३ ऑक्टोबरला रात्री उशिरा ४ धर्मांध दुचाकीवरून आले आणि त्यांनी जयेश गुजरीया यांच्यावर तलवार, चाकू आणि पाईप यांद्वारे आक्रमण केले. गुजरीया यांच्यावर आक्रमण करतांना धर्मांध ‘नवरात्रीचा फलक का लावलास ?’, असा प्रश्‍न वारंवार चिडून विचारत होते. या वेळी गुजरीया यांच्यासमवेत असलेल्या त्यांच्या दोघा सहकार्‍यांंनी गुजरीया यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता धर्मांधांनी त्या दोघांवरही आक्रमण केले. या आक्रमणात गुजरीया हे गंभीररित्या घायाळ झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेले असता तेथे त्यांचा मृत्यू झाला. आक्रमणानंतर धर्मांध घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. नवरात्रीमध्ये जयेश गुजरीया आणि धर्मांध यांच्यात मारामारी झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *