Menu Close

श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देणार्‍या शिवसैनिकांना धर्मांधांकडून मारहाण !

तक्रार करण्यास गेलेल्या शिवसैनिकांवर पोलीस ठाण्यातच आक्रमण

एकीकडे ३ सहस्र ६०० कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले जात आहे; मात्र दुसरीकडे धर्मांधांकडून महाराजांच्या घोषणा देण्यालाच विरोध केला जात आहे. यावरून एवढे कोटी रुपये खर्च करून स्मारक उभारण्यापेक्षा महाराजांप्रमाणे राज्य केले, तर असा विरोध करण्याचे धर्मांधांचे धाडस होणार नाही, हे भाजप सरकार जाणील तो सुदिन !

बीड : येथील माजलगावमध्ये जाणार्‍या शिवसैनिकांनी श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी घोषणा दिल्याने त्यांना धर्मांधांनी मारहाण केली. या मारहाणीच्या प्रकरणी तात्काळ गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये नुकताच एक मेळावा आयोजित केला होता. तो मेळावा संपल्यानंतर घोषणा देणार्‍या शिवसैनिकांना माजलगाव येथील गुंड बिलाल चाऊस, तालेब चाऊस, गाझी चाऊस यांनी मारहाण केली. याची तक्रार देण्यासाठी माजलगाव पोलीस ठाण्यात गेलेल्या शिवसैनिकांवर पोलीस ठाण्यातच धर्मांधांनी आक्रमण परत केले. याविषयी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुलूक यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना दिलेल्या निवेदनात, ‘भविष्यात या गुंडामुळे हिंदु-मुसलमान वाद पेटण्याची शक्यता आहे. या गुंडावर तात्काळ कारवाई करावी’, असे नमूद केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *