वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून विविध चर्च आणि मिशनरी संस्था यांमध्ये लैंगिक शोषण, बलात्कार, लहान मुलांची विक्री आदी अपप्रकार होण्याचे प्रकार सतत घडत आहेत. केरळच्या चर्चमधील एका ननवर बिशप फ्रँन्को मुलक्कल याने १३ वेळा बलात्कार केल्याचे उघड झाल. हे फक्त एक प्रकरण असून देशभरात अशा कितीतरी घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व चर्च आणि मिशनरी संस्था यांची चौकशी करण्यासाठी एक विशेष आयोग नेमावा, तसेच अशा प्रकरणांंतील चर्च, पाद्री अन् बिशप आदींचे खटले जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना त्वरीत शिक्षा होण्यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने स्थानिक विकास भवनासमोर २६ ऑक्टोबर या दिवशी करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये केली.
प्रयाग कुंभमेळ्यासाठी रेल्वेने जाणार्या भाविकांवर रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदूंवर अन्याय करणारा हा निर्णय सरकारने त्वरित रहीत करावा, तसेच अनैतिक आणि अवैध धंदे, जुगार, अमली पदार्थ, मानवी तस्करी आदी अनेक गोष्टींवर प्रतिबंध आणण्यासाठी ऑनलाईन वेश्या व्यवसाय चालवणार्या संकेतस्थळांवर बंदी आणावी, अशा मागण्याही या आंदोलनात करण्यात आल्या.
यानंतर जिल्हाधिकार्यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले. हे निवेदन अधीक्षक राम कांबले यांनी स्वीकारले. या आंदोलनाला हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच धर्माभिमानी उपस्थित होते.