यवतमाळ : केरळमधील शबरीमलाच्या धरतीवर शनिशिंगणापूरसह राज्यातील मंदिरे आणि त्यांच्या धार्मिक प्रथा परंपरा यांच्या रक्षणासाठी सरकारने विशेष कायदा करावा, या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २४ ऑक्टोबरला निवेदन देण्यात आले.
या वेळी उपजिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘सरकार हिंदूंचेच आहे, बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक भावनांचे रक्षण करण्यासाठी शासन विशेष कायदा करू शकते. आम्ही आपल्या भावना शासनाला कळवू.’’
चिनी फटाके विक्रेत्यांवर कारवाई करू ! – अमरसिंह जाधव, पोलीस उपअधीक्षक
यवतमाळ : चिनी फटाके विक्रेत्यांवर कारवाई करू, असे आश्वासन पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव यांनी दिले. या विरोधातील निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांना देण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. चिनी फटाक्यांमध्ये ‘पोटॅशियम क्लोराईड’ आणि ‘पोटॅशियम परक्लोराइड’ यांचे रासायनिक मिश्रण वापरले जाते आणि त्यांच्या वापरावर भारतात बंदी आहे. चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले, तरी अत्यंत प्रदूषणकारी आहेत. भारत सरकारने चिनी फटाक्यांवर बंदी घातलेली आहे. तरीही अवैध मार्गाने चिनी फटाके भारतात आणून त्याची विक्री होत असल्याचे वारंवार उघड होत आहे. या संदर्भात पोलिसांनी विशेष दक्षता बाळगून अवैधरित्या चिनी बनावटीच्या फटाक्यांची विक्री करणार्यांवर तात्काळ योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ ऑक्टोबरला त्यांंना निवेदन देण्यात आले.