जळगाव : येथील पारोळा तालुक्यातील मराठखेडे गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पनून काश्मीर, बांग्लादेशी हिंदूवरील अत्याचार, गोहत्या, लव्ह जिहाद, क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा जाज्वल्य इतिहास अन् धर्मशिक्षण या विषयांवरील फ्लेक्स प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठखेडा येथील धर्मशिक्षणवर्गातील तरुणांनी प्रदर्शन आयोजित केले होते. ह.भ.प. सोपान महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाला प्रारंभ करण्यात आला. या वेळी गावातील ग्रामपंचायत सभासद, तसेच प्रतिष्ठित उपस्थित होते. या प्रदर्शनाचा लाभ ४०० लोकांनी घेतला.
सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती केली. कु. रागेश्री यांचा सत्कार कु. शीतल पाटील यांच्या हस्ते झाला. कु. रागेश्री यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ २५० जिज्ञासूंनी घेतला. या वेळी हिंदु धर्मावर होणार्या आघातांची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली. समितीचे श्री. विनोद शिंदे यांनी हितचिंतकांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी सर्वश्री रवी पाटील, कैलास पाटील, गणेश पाटील, महेंद्र पाटील, प्रदीप पाटील, स्वप्नील पाटील, तसेच गावांतील तरुणांनी परिश्रम घेतले.
क्षणचित्रे
१. मार्गदर्शनाला ५० टक्के महिलांची उपस्थिती लाभली.
२. मार्गदर्शनाच्या वेळी सांगवी गावातील २० धर्माभिमानी तरुण दुचाकीला भगवे ध्वज लावून घोषणा देत कार्यक्रमस्थळी आले.
३. २० धर्माभिमान्यांनी स्वयंस्फूर्तीने पत्रके वाटून कार्यक्रमचा प्रसार ८ गावांमध्ये केला होता. तसेच त्यांनी आदल्या रात्री १ पर्यंत जागून कार्यक्रमाची सिद्धताही केली.
विशेष – भारत-पाक क्रिकेट सामना असूनही तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. (क्रिकेटच्या सामन्याचा त्याग करून धर्मरक्षणासाठी वेळ देणार्या कृतीशील तरुणांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात