Menu Close

यवतमाळ येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला ४०० हून अधिक नागरिकांचा स्वाक्षरीद्वारे पाठिंबा !

यवतमाळ : चर्च आणि मिशनरी संस्था यांची चौकशी करावी, मुसलमानांसाठी बक्षीसपात्र मालमत्तेसाठी नोंदणी न करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, प्रयाग कुंभमेळ्यासाठी रेल्वेने येणार्‍या भाविकांवर रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त अधिभार लावण्याचा केलेला निर्णय त्वरित रहित करावा, अनैतिक आणि अवैध धंदे, अमली पदार्थ, मानवी तस्करी आदी अनेक गोष्टींवर प्रतिबंध आणण्यासाठी ‘ऑनलाईन’ वेश्याव्यवसाय चालवणार्‍या सर्व संकेतस्थळांवर बंदी आणावी, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या देशविघातक संघटनेवर बंदी आणावी या मागण्यांसाठी स्थानिक दत्त चौक येथे २६ ऑक्टोबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. याला ४०० हून अधिक जिज्ञासूंनी स्वाक्षरीद्वारे पाठिंबा दिला. या आंदोलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समितीचे २५ कार्यकर्ते सहभागी झाले. गोपनीय शाखेच्या दोन पोलीस अधिकार्‍यांनी आंदोलनाचे चित्रीकरण केले.

Related News

0 Comments

  1. matthew fofi

    US could be giving Pakistan weapons that will lead to the killing of its (US’) own citizens. Is US also supporting ISIS buying oil from them? Gas has dropped by half the price since I’ve returned from India and it’s always increasing…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *