कोपरगाव (जिल्हा नगर) : गेल्या काही दिवसांपासून चर्च आणि मिशनरी संस्था यांमध्ये लैंगिक शोषण, बलात्कार, लहान मुलांची विक्री आदी अपप्रकार सतत घडत आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व चर्च आणि मिशनरी संस्था यांची चौकशी करण्यासाठी एक विशेष आयोग नेमावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी यांनी केली. ते २४ ऑक्टोबर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते. अशा प्रकरणांतील चर्च, पाद्री अन् बिशप आदींचे खटले जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना तात्काळ शिक्षा होण्यासाठी केंद्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
या वेळी तहसीलदार श्री. किशोर कदम यांच्या वतीने नायब तहसीलदार श्री. शिवाजी सुसरे यांना निवेदन देण्यात आले. विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. आदिनाथ ढाकणे, बजरंग दल संयोजक श्री. तुषार आव्हाड, योग वेदांत सेवा समितीचे श्री. शिरसाठ काका, लहुजी संघटनेचे श्री. अमोल पगारे, हिंदुत्वनिष्ठ श्री. आकाश पंडोरे, श्री. सुरेश चावरे, श्री. साईनाथ कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते.