भाविकांच्या आंदोलनाविषयी आतापर्यंत साधी प्रतिक्रियाही व्यक्त न करणारे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे फुकाचे बोल !
कन्नूर (केरळ) : सध्या केरळमध्ये धार्मिक परंपरा आणि राज्य सरकारची क्रूरता यांच्यात संघर्ष चालू आहे. भाजप, संघ आणि इतर संघटना यांच्या २ सहस्रांहून अधिक कार्यकर्त्यांना कह्यात घेण्यात आले आहे. आम्ही डाव्यांना सांगू इच्छितो की, आम्ही भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे केले. कन्नूर येथील नूतन पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
शहा पुढे म्हणाले, ‘‘न्यायालयाच्या निर्णयाच्या आडून काही जण हिंसेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि देशातील अनेक मंदिरांत त्यांचे स्वतःचे नियम आणि परंपरा पाळल्या जात आहेत. हिंदु धर्माने महिलांचा कधीही अवमान केलेला नाही. उलट कायम देवीच्या रूपात त्यांची पूजा केली आहे. केरळ सरकार दडपनीतीचा अवलंब करत आहे. तुम्ही हीच नीती कायम ठेवली, तर भाजपचे कार्यकर्ते तुम्हाला उत्तर देतील.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात