Menu Close

नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनुस्मृति जाळण्याचा प्रयत्न !

मनुस्मृति जाळल्यामुळे त्यातील सत्यनिष्ठ विचार नष्ट होत नाहीत; म्हणूनच ती सहस्रो वर्षे टिकून आहे. जगभरात हिंदूंच्या धर्मग्रंथांचा अभ्यास होत असतांना भारतात मात्र सत्तास्वार्थासाठी त्याचे महत्त्व न जाणता जातीद्वेष पसरवण्यासाठी त्याचा उपयोग केला जात आहे, हे दुर्दैव !

नाशिक : येथे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी आणि मनुस्मृति यांच्या विरोधात घोषणा देत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीचे दहन करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना रोखले, असे समजते. सातत्याने मनुस्मृतीच्या विरोधात गरळओक करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना या संदर्भात नुकतेच धमकीचे पत्र आल्याचे त्यांनी सांगितले होते. यावर कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

(म्हणे) ‘यापुढेही आम्ही मनुस्मृतीचे दहन करणारच !’ – भुजबळ यांची दर्पोक्ती

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जातीद्वेषाचे सूत्र उकरून काढून समाजाला भडकावण्याचेच हीन राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

नाशिक : मला धमकीचे पत्र पाठवण्यात आले असले, तरी यापुढेही आम्ही मनुस्मृतीचे दहन करणारच. समाजाचे चक्र उलटे फिरवणार्‍या प्रवृत्तींच्या विरुद्ध बोलतच रहाणार. आंबेडकर यांच्या विचाराला विरोध करणार्‍यांच्या विरोधात आम्ही कधीही शांत बसणार नाही, अशी दर्पोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी केली. येथे आयोजित ‘ऑल इंडिया सैनी’ (माळी) समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. (डॉ. आंबेडकर यांनी मनुस्मृति ग्रंथाचे कौतुक केले आहे, हे भुजबळ यांना ठाऊक आहे का ? त्यामुळे प्राचीन हिंदु धर्मग्रंथांना विरोध करून भुजबळ हेच चक्रे उलटी फिरवत आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

भुजबळ पुढे म्हणाले, ‘‘देहलीत घटना जाळणार्‍या व्यक्तींवर कारवाई न करताच त्यांना सोडून देण्यात येते, याउलट मनुस्मृति जाळणार्‍या लोकांवर गुन्हे नोंद केले जातात. आमचा लढा हा समतेला विरोध करणार्‍या प्रवृत्तींच्या विरोधात आहे. अनेकदा आमचे तोंड बंद करण्याचे प्रयत्न करण्यात आले. अडीच वर्षे कारागृहात ठेवले.’’ (भुजबळ यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे त्यांना कारागृहात ठेवले असेल, तर चूक ते काय ? भ्रष्टाचार करून आणि जनतेला लुबाडून सत्ता भोगत रहाण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) 

(म्हणे) ‘भुजबळांच्या केसालाही धक्का लागला, तर महाराष्ट्र पेटून उठेल !’

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची धमकी !

मुंबई : मुख्यमंत्री महोदय राज्यात हे काय चालले आहे ? भिडेच्या पिलावळीला आवरा. छगन भुजबळांच्या केसालाही धक्का लागला, तर महाराष्ट्र पेटून उठेल, अशी धमकी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. (लोकहो, जातीद्वेषाचे हीन राजकारण आणि भ्रष्टाचार करणार्‍या अन् दंगलीच्या धमक्या देणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे खरे स्वरूप जाणा आणि येत्या निवडणुकीत त्यांना कायमचा धडा शिकवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *