प्रार्थनासभेत पाद्रयांकडून हिंदु धर्मावर टीका केल्याने हिंदू संतप्त : हिंदूंच्या धर्मांतराचाही डाव उधळला !
- ‘भाजप सरकार, पोलीस आणि प्रशासन हिंदु धर्मावरील आघात रोखू शकत नसल्यानेच हिंदुत्वनिष्ठांना कृती करावी लागते’, असे कोणी म्हटल्यास चूक ते काय ?
- ऊठसूट हिंदूंच्या संतांवर टीका करणारे पुरो(अधो)गामी आणि हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे ख्रिस्ती धर्मगुरूंच्या या कुकृत्यांविषयी गप्प का ?
आगरा : येथील फतेहबाद रस्त्यावरील हॉटेल समोवर येथे आयोजित करण्यात आलेल्या ख्रिस्त्यांच्या प्रार्थनासभेत हिंदु धर्मावर टीका करण्यात आल्याच्या प्रकरणी विहिंप आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी ख्रिस्त्यांना चांगलाच चोप दिला. या प्रार्थनासभेत हिंदूंच्या धर्मांतराचा डाव आखण्यात आला होता. हा डावही उधळून लावण्यात आला.
खटीकपाडा निवासी सनी बंसवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ख्रिस्त्यांनी ‘द चर्च फैमिली यूपी’च्या अंतर्गत परिसरातील लोकांना एका ‘सत्संगा’साठी बोलावले होते. (ख्रिस्त्यांकडून ‘सत्संगा’सारखे शब्द वापरून हिंदूंना कसे फसवण्यात येते, हे यातून दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यामध्ये हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी ख्रिस्ती धर्मगुरूंनी हिंदु धर्मावर अवमानकारक विधाने करून टीका केली. यामुळे उपस्थित हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली. या कार्यक्रमाची अगोदरच माहिती मिळाल्यानंतर विहिंप आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनीही उपस्थित राहून ख्रिस्ती धर्मगुरूंचे भाषण ध्वनीचित्रित केले. या सभेत हिंदु धर्मावर टीका करून त्याचा अवमान झाल्यामुळे विहिंप आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ख्रिस्त्यांना चोप दिला.
इतकेच नव्हे, तर कार्यकर्त्यांनी ७ ख्रिस्त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, तसेच ख्रिस्त्यांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याची तक्रारही केली. विशेष म्हणजे ख्रिस्त्यांनी या कार्यक्रमाची कोणतीही अनुमती घेतली नव्हती. या घटनेनंतर या प्रार्थनासभेच्या आयोजकांनीही कांगावा करत हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी कथित तोडफोड केल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात