अशी मागणी का करावी लागते ? चिनी फटाक्यांमुळे होत असलेले वायूप्रदूषण आणि चीनची घुसखोरी या गोष्टी लक्षात घेऊन प्रशासनानेच अशा फटाक्यांवर बंदी घातली पाहिजे !
सिंधुदुर्ग : फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे छापली जातात. असे फटाके फोडल्यानंतर त्यावरील चित्रे छिन्नविछिन्न होतात, तसेच अनेकदा ती पायाखाली, कचर्यात, गटारांत पडलेली निदर्शनास येतात. त्यामुळे देवतांची विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होऊन कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतात आणि राष्ट्रीय अस्मितांवरही आघात होत आहेत. अशा फटाक्यांची निर्मिती अन् विक्री कायमची बंद व्हावी, यासाठी कठोर कारवाई करावी, तसेच चिनी बनावटीच्या फटाक्यांच्या मोठ्या प्रमाणात होणार्या विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. दिलिप पांढरपट्टे यांच्याकडे केली आहे. याविषयीचे एक निवेदन मालवणचे तहसीलदार अन् पोलीस ठाणे येथेही देण्यात आले आहे.
सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी डॉ. दिलिप पांढरपट्टे यांना निवेदन देतांना श्री. रवींद्र परब, श्री. सुरेश दाभोलकर, श्री. गजानन मुंज, श्री. जगन्नाथ केरकर, श्रीमती आशा धोंडे आणि सौ. विभा कामत आदी उपस्थित होते.
मालवण : येथे नायब तहसीलदार सुहास खडपकर आणि पोलीस नाईक कु. स्वाती जाधव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री करलकर, रत्नाकर कोळंबरकर, सुहास दुधवडकर, लक्ष्मण कुर्ले, शिवाजी देसाई आणि चेतन सकपाळ उपस्थित होते.