Menu Close

हास्य अभिनेता रहमान खानला बलात्कार प्रकरणी अटक

मुंबई : ‘कॉमेडी सर्कस’ हास्य अभिनेता रहमान खान याला एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या महिलेने २९ फेब्रुवारी रोजी रहमानविरोधात सांताक्रूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पडताळणी करून पोलिसांनी गुन्हा दाखल करत रहमानवर कारवाई केली.

रहमान आणि या महिलेची एक वर्षापूर्वी सोशल मीडिया वर मैत्री झाली होती. त्यानंतर रहमानने या महिलेकडून कर्जाऊ दोन लाख रुपये घेतले. काही महिन्यांनी या महिलेने पैसे परत मागितले असता रहमानने तिला पैसे घेण्यासाठी वसई येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. तिथे रहमान याने आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. रहमानने हा प्रकार कॅमेऱ्यात शूट करून आपल्याला ब्लॅकमेल केल्याचेही तिने तक्रारीत पुढे नमूद केले आहे.

पीडित महिला मुंबईत राहणारी असून घटना वसईत घडलेली असल्याने सांताक्रूज पोलिसांनी हे प्रकरण वसईतील वालीव पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे. पोलिसांनी कुर्ला येथून मंगळवारी रहमानला अटक केली.

दरम्यान, कॉमेडी सर्कससह द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, मेड इन इंडिया अशा लोकप्रिय कॉमेडी टीव्ही शोमध्ये रहमान खान झळकला आहे.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *