राम मंदिराच्या सूत्रावरून विहिंपचे नेते प्रवीण तोगाडिया यांचे संघाला आवाहन !
मुंबई : २०१४ पासून केंद्रात असलेले भाजपचे सरकार राम मंदिराविषयी आतापर्यंत गप्प का होते ? विरोधी पक्षाकडून आंदोलन केले जाते; मात्र आता तर तुमचे स्वयंसेवक सत्तेत असतांना आंदोलनाच्या गोष्टी कशासाठी ? आता आंदोलन करून आम्ही एकाही हिंदूला मरू देणार नाही. राम मंदिरासाठी संसदेत कायदा करा. एकतर वचनाचे पालन करा, नाहीतर वचनाचे पालन न करणार्यांना सत्तेवरून हटवा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष आणि विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केले. २ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भयाज्जी जोशी यांच्या ‘राम मंदिरासाठी वर्ष १९९२ प्रमाणे आंदोलन करू’, या वक्तव्यावर श्री. तोगाडिया यांनी एका चलचित्राद्वारे वरील भूमिका मांडली.
डॉ. तोगाडिया यांनी पुढे सांगितले की की, राम मंदिराच्या मागणीसाठी आम्ही २१ ते २३ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत लखनऊ येथे आंदोलन केले. त्या वेळी भाजप शासनाने आमचे अन्न काढून घेतले. रहाण्याची व्यवस्थाही केली नाही. राम मंदिराची मागणी करणार्यांशी असा व्यवहार केला जातो का ? संघाने नरेंद्र मोदी यांना राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याचा आदेश द्यावा, नाहीतर त्यांना सत्तेवरून हटवावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments