बारामती (जिल्हा पुणे) : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फटाक्यांच्या चित्रांद्वारे होणारी हिंदूंची देवता अन् राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखणे आणि अवैधरित्या विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालण्याविषयीचे निवेदन येथील तहसीलदार हनुमंत पाटील यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदन देण्यापूर्वी तहसीलदार यांनी फटाके विक्रेत्यांची बैठक बोलावली होती, त्याविषयी समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘फटाके विक्रेत्यांना दुकानांमध्ये निवेदन देतांना ते पोलीस आणि प्रशासन यांना द्या, आम्हाला देऊन उपयोग नाही’, असे सांगतात’, असे म्हटल्यावर श्रीकांत पाटील म्हणाले, ‘‘अशी उत्तरे देणार्या फटाके विक्रेत्यांवर पुढच्या वर्षी कारवाई करण्यात येईल.’’ (पुढील वर्षीपेक्षा याच वर्षी कारवाई का नाही करत ? – संपादक)
फलटण येथे निवेदन
फलटण (जिल्हा सातारा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार विजय पाटील आणि पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.