फटाक्यांविषयीच्या निवेदनानंतर ठाणे विशेष दंडाधिकार्यांचे पुढील कार्यवाहीचे आदेश देण्याचे आश्वासन !
ठाणे : येथील विशेष दंडाधिकारी श्री. दिनेश पैठणकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रहानी करणार्या फटाक्यांची विक्री रोखण्याविषयीचे निवेदन दिले. यावर त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस खाते, नगरपालिका, तहसीलदार आणि संबंधित सर्वांना याविषयी पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देणार असल्याचे आश्वासन दिले.