चिपळूण येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दीपावलीच्या शुभेच्छा देण्याकरता समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतल्या धर्मप्रेमींच्या भेटी
चिपळूण : दीपावली सणाचे औचित्य साधून येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांच्या सदिच्छा भेटी घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या भेटीत धर्मप्रेमींनी समितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ‘या भेटीतून धर्मबंधुत्व निर्माण होण्यास साहाय्य होत असून संघटित कार्य करण्यासाठी त्याची नितांत आवश्यकता आहे’, असे प्रतिपादन धर्मप्रेमींनी व्यक्त केले. या वेळी समितीच्या वतीने सर्व धर्मप्रेमींना भेटपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यामध्ये चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्र आमदार श्री. सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. सचिन कदम, शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री. शशिकांत चाळके, शिवसेना तालुकाप्रमुख आणि श्रीरामवरदायिनी देवस्थानचे अध्यक्ष श्री प्रतापराव शिंदे, पंचायत समिती उपसभापती श्री. शरद शिगवण, वारकरी फडकरी दिंडी संघटनेचे ह.भ.प. प्रमोद महाराज निवळकर, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री सतीशराव मोरे, चिपळूण नगराध्यक्षा सौ. सुरेखाताई खेराडे, मनसे तालुकाप्रमुख श्री संतोष नलावडे, श्री स्वामी मंगल सभागृहाचे श्री. केतन चव्हाण, चैतन्य परिवार, श्री चितळे मंगल कार्यलयाचे श्री. मोहन चितळे, श्री काळभैरव देवस्थानचे श्री. समीर शेट्ये यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमात समितीच्या वतीने श्री. सुरेश शिंदे आणि डॉ. हेमंत चाळके यांनी सहभाग घेतला.
प्रशासकीय अधिकार्यांना समितीच्या वतीने दीपावलीच्या शुभेच्छा !
येथील प्रांताधिकारी श्रीमती कल्पना जगताप-भोसले आणि पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनाही समितीच्या वतीने कार्यकर्त्यांनी भेट घेेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.