अयोध्या : राममंदिराच्या संदर्भात लवकरच निर्णय लागेल आणि घटनेच्या चौकटीत राहून राममंदिर उभारले जाईल, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. दिवाळीच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामलला आणि हनुमानगढी येथे दर्शन घेतले. त्या वेळी त्यांनी हे विधान केले.
त्यानंतर झालेल्या संतांच्या भेटीनंतर योगी म्हणाले, ‘‘अयोध्येत रामललाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. येथे राममंदिर होते आणि पुढेही राहील. राममंदिराला भव्य स्वरूप देण्याची मागणी असल्याने त्यासाठी सरकार सकारात्मक दिशेने प्रयत्न करत आहे.’’ राममंदिराच्या संदर्भात कायदेशीर अडचणी असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत रामाची भव्य मूर्ती उभारण्याची घोषणा केली होती. शरयू नदीच्या तीरावर मूर्तीची जागा निश्चित करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात