रुद्रप्रयाग येथील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी स्थानिक भाविकांकडून आंदोलन : चित्रपटावर बंदी घालण्याची पुजार्यांची मागणी
वारंवार हिंदूविरोधी चित्रपट काढणारे आणि त्याला संमती देणारे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ यांच्यावर भाजप सरकार काही कारवाई का करत नाही ?
केदारनाथ (उत्तराखंड) : ‘केदारनाथ’ या चित्रपटाचे ‘पोस्टर’ आणि ‘टीझर’ नुकतेच प्रसिद्ध झाले असून या चित्रपटात लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात आले असल्याचा आरोप होत आहे. या चित्रपटाची कथा आणि त्यातील दृश्ये यांवर आक्षेप घेत काही स्थानिक भाविकांनी रुद्रप्रयाग येथील जिल्हा मुख्यालयासमोर आंदोलन केले.
१. वर्ष २०१३ मध्ये उत्तराखंड येथे आलेल्या महाप्रलयावर आधारित हा चित्रपट असून चित्रपटात अभिनेते सैफ अली खान यांची मुलगी सोहा अली खान आणि अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांनी भूमिका आहे. अभिषेक कपूर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात मुसलमान नायक आणि हिंदु नायिका यांच्यातील प्रेमसंबंध दाखवण्यात आले आहेत.
२. केदारनाथ येथील सतेराखाल आणि आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक भाविकांनी चित्रपटाच्या विरोधात आंदोलन केले. या वेळी चित्रपटाचा फलक, दिग्दर्शक, नायक आणि नायिका यांचे पुतळे जाळले. ‘चित्रपटाच्या ‘टीझर’मध्ये दाखवण्यात आलेली दृश्ये देेवभूमी आणि केदारनाथची आस्था यांची छेडछाड केली आहे. वस्तुत: येथील प्रथा-परंपरा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे नसून त्याच्या एकदम उलट आहेत’, असे आंदोलनकर्त्या स्थानिक भाविकांनी म्हटले आहे.
३. आंदोलनात सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते गंभीर बिष्ट म्हणाले की, चित्रपट निर्मात्यांनी हिंदूंच्या धर्मश्रद्धा दुखावल्या आहेत. चित्रपटातील दृश्ये न हटवल्यास प्रदेशव्यापी आंदोलन केले जाईल. भाजपचे उत्तराखंड प्रवक्ते डॉ. देवेंद्र भसीन म्हणाले, ‘‘धार्मिकस्थळांशी संबंधिक श्रद्धा आणि परंपरा यांची काळजी घेऊन त्या दुखावल्या जाणार नाहीत, हे लक्षात घेतले गेले पाहिजे. धार्मिकस्थळांशी संबंधित चित्रपटांतील दृश्यांमध्ये कोणतीही अतिशयोक्ती करण्याची आवश्यकता नसते.’’
४. केदारनाथ मंदिरातील पुजार्यांनीही या चित्रपटाला विरोध केला आहे. चित्रपटावर बंदी न घातल्यास आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. (पुजार्यांना चेतावणी का द्यावी लागते ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे सरकारला कळत नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) केदारनाथ मंदिराजवळ या चित्रपटातील एका अश्लील गाण्याचे चित्रीकरणही करण्यात आले होते. त्यालाही पुजार्यांनी विरोध केला होता.
५. ‘उत्तराखंडच्या महाप्रलयात सहस्रो लोकांनी प्राण गमावले होते. अशा महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील मुख्य कलाकार अश्लील दृश्ये देतांना दाखवण्यात आले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या ‘टीझर’मध्ये मुसलमान नायक हिंदु नायिकेला आपल्या पाठीवर वाहून नेतांना दाखवण्यात आले आहे. हे पूर्णत: चुकीचे असून केदारनाथच्या ‘ट्रेकिंग’ मार्गावर कोणतीही मुसलमान व्यक्ती यात्रेकरूंना पाठीवर वाहून नेत नाही’, असे शुक्ला यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी चित्रपटाच्या ‘प्रेम हीच तीर्थयात्रा’ या ‘टॅगलाईन’वरही आक्षेप घेतला आहे. (नवरात्रीच्या कालावधीत ‘लवरात्री’ असे नाव असलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन होणार होते. हिंदूंनी त्याला विरोध केल्याने चित्रपटाच्या नावात पालट करण्यात आला. केदारनाथ चित्रपटाला ‘प्रेमाची तीर्थयात्रा’ म्हणणार्यांचाही हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करायला हवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
६. भाजपचे नेते अजेंद्र अजय यांनी ट्वीटद्वारे या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्याकडे केली आहे. (भाजपच्या नेत्यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या संदर्भात केवळ ‘ट्वीट’ करून न थांबता चित्रपटावर बंदी येईपर्यंत ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे. हिंदुत्वाच्या सूत्रावर निवडून आलेल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून हिंदू एवढी अपेक्षा नक्कीच करू शकतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात