• काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना ही शिक्षाच म्हणावी लागेल !
• हिंदूबहुल भारतात सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावतील म्हणून अफझलखानवधाचे चित्र लावण्यावर बंदी घातली जाते. याउलट हिंदूंच्या भावना दुखावत असल्याची वारंवार तक्रार करूनही क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती सरकारी खर्चाने साजरी केली जाते ! हिंदूबहुल भारतात हिंदूंची ही गळचेपी कधी थांबणार ?
• सरकार सर्व निर्णय ‘निधर्मी’ घटनेच्या आधारे घेते आणि यामध्ये हिंदूहित कदापि साधले जात नसल्याचा इतिहास असल्याने कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेत आले, तरी हिंदूंची गळचेपीच होते ! यास्तव हिंदूहित साधणारी घटना (अर्थात् हिंदु राष्ट्र) स्थापन करणे, हाच सर्व समस्यांवरील उपाय आहे, हे हिंदूंनी जाणावे आणि संघटित व्हावे !
बेंगळूरू : समस्त हिंदूंचा तीव्र विरोध मोडीत काढत कर्नाटकमधील काँग्रेस आणि संयुक्त जनता दल यांच्या आघाडी सरकारने १० नोव्हेंबरला क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी केली.
क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या निषेधार्थ श्रीराम सेनेसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच भाजपने राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने केली. (केंद्रात सत्तेत असूनही विरोधी पक्षांप्रमाणे आंदोलने करत बसणारा भाजप ! हाती सत्ता असतांना भाजप आक्रमकांच्या जयंतीवर बंदी का घालत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तथापि स्वतःच्या भूमिकेवर ठाम रहात कर्नाटक सरकारने जयंती साजरी केली. या वेळी पोलिसांनी भाजपच्या अनेक नेत्यांना कह्यात घेतले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी राज्यातील हुब्बळ्ळी आणि धारवाड या २ प्रमुख संवेदनशील शहरांमध्ये जमावबंदी आदेश लागू केला होता. याच २ शहरांत टिपूच्या जयंतीला सर्वाधिक विरोध झाला. टिपूची जयंती साजरी करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात समस्त हिंदूंनी कोडगू येथे बंद पाळला.
हुब्बळ्ळी येथे तहसीलदार कार्यालयात टिपूच्या जयंतीचा कार्यक्रम होत असतांना आंदोलन करणारे भाजपचे खासदार प्रल्हाद जोशी, आमदार शंकर पाटील यांच्यासह ५० जणांंना पोलिसांनी अटक केली. धारवाड येथील सुभाष मार्गावरील भाजप कार्यालयासमोरूनही ५० हून अधिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
चिक्कबळ्ळापूर येथील कार्यक्रमाला कोणीच आले नाही !
चिक्कबळ्ळापूर येथील आंबेडकर भवनात सकाळी ११ वाजता टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात येणार होती; मात्र कार्यक्रमाला कोणीही आले नाही. कार्यक्रमाला आलेले पाहुणे बर्याच वेळ वाट पहात होते. शेवटी शाळेतील विद्यार्थ्यांना बोलावून कार्यक्रम उरकण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात