- गायींची सर्वाधिक प्रमाणात हत्या होण्याला काँग्रेसची ६० वर्षांची हिंदुद्वेषी राजवट कारणीभूत आहे !
- काँग्रेसचे पाप अक्षम्य असून त्याने कितीही दिखावा केला, तरी त्यांच्या खोट्या गोप्रेमावर कोण विश्वास ठेवणार ?
भोपाळ : मध्यप्रदेशमधील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा बांधणार असल्याचे आश्वासन मध्यप्रदेशमधील काँग्रेसने हिंदूंना दिले. येथील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश काँग्रेसने १० नोव्हेंबर या दिवशी पक्षाचे अनुमाने ११२ पानांचे निवडणूक घोषणापत्र प्रसिद्ध केले. या वेळी प्रदेश काँग्रेसचे प्रमुख कमलनाथ, प्रचार समितीचे प्रमुख ज्योतिरादित्य सिंधिया आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात