हिंदूंच्या सणांच्या वेळी हिंदूंवर आक्रमण करणार्या उद्दाम धर्मांधांना पोलिसांचे भय राहिलेले नाही, हेच यातून दिसून येते. हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी धर्मांधांकडून हेतूपुरस्सर हिंदूंवर वारंवार आक्रमणे होणे, हे सरकारला लज्जास्पद आहे. त्यामुळे हिंदूंचे रक्षण होण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
जळगाव : जामनेर तालुक्यातील पहुर पेठ गावात ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास धर्मांधांनी शुल्लक कारणावरून हिंदूंच्या घरात घुसून मारहाण केली आणि दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी १४ धर्मांधांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यापैकी २ आरोपींना रात्रीच पोलिसांनी अटक करून त्यांची ८ नोव्हेंबरला जामिनावर सुटका केली.
१. ७ नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बारी वाडा आणि खाटीक वाडा या ठिकाणी गावातील काही धर्मांध मद्याच्या नशेत येथील गल्लीत फटाके फोडत होते. तेव्हा काही तरुणांनी त्यांना फटाके फोडण्यास मनाई केली. तेव्हा धर्मांधांनी हिंदु तरुणांना शिवीगाळ केली.
२. त्यामुळे चिडलेल्या हिंदु तरुणांनी त्यांचा प्रतिकार केला. याचा राग मनात धरून या धर्मांधांनी मोहल्ल्यात जाऊन अन्य सहकार्यांना घेऊन हिंदु वस्तीवर लाठ्या-काठ्या यांनी आक्रमण केले. त्यांचा प्रतिकार करत असतांना राजू वामन कलाल या तरुणाला या धर्मांधांच्या टोळक्याने मारहाण करून पुष्कळ दुखापत केली.
३. ही वार्ता गावात वार्यासारखी पसरली. त्यामुळे हिंदूंचासुद्धा जमाव जमला. दोन्ही गटांकडून काही काळ दगडफेक करण्यात आली. या वेळी पोलीस निरीक्षक शिरसाट यांनी अन्य पोलिसांसह दोन्ही बाजूच्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
४. त्याच वेळी मज्जिद चौकात हिंदु-मुस्लीम वस्तीवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. गावातील शांतता समितीच्या सदस्यांनी दोन्ही जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
५. जमाव शांत झाल्यानंतर घायाळ राजू कलाल यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
६. त्यानंतर राजू कलाल यांच्या तक्रारीवरून शाहरुख तडवी, शेख राजू अजित शेख, अझर शेख राजू, आशु तडवी इक्रमुद्दिन इसा, मोदीं तडवी, अकील तडवी इत्यादींच्या विरोधात पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
७. या आरोपींपैकी शेख राजू शेख आणि अयूब कसाई या दोघांना रात्रीच अटक करून ८ नोव्हेंबरला न्यायालयात नेऊन जामिनावर सोडण्यात आले.
८. यापूर्वी यातील आरोपी शेख अझर शे राजू याच्याकडून ३ नोव्हेंबर २०१८ ला सकाळी १० वाजता बसस्थानक परिसरात गावातील शेतकरी भास्कर दगडू पांढरे यांना उसनवारीने पैसे मागितले; म्हणून त्याने शिवीगाळ आणि मारहाण केली होती.
९. अशा आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात