- या देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण म्हणून हिंदूंना अफझलखानवधाचा दिवस साजरा करण्यास बंदी घातली जाते, तर क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती मात्र सरकारी खर्चाने साजरी होते ! यावरून निधर्मीपणा किंवा सर्वधर्मसमभाव म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून निवळ हिंदुद्वेषच असतो, हे सिद्ध होते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
- हिंदूबहुल भारतात इस्लामी आक्रमकाची जयंती हिंदूंच्याच पैशांतून साजरी होऊ देणे भाजप सरकारला लज्जास्पद !
बेंगळूरू : कर्नाटक राज्यात टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा वाद विकोपाला गेला असतांना या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकामुळे मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी हे या कार्यक्रमाच्या उपस्थित रहाण्याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना ३ दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा कालावधी ९ ते ११ नोव्हेंबर असा येतो, तर टिपू सुलतानची जयंती १० नोव्हेंबरला साजरी होणार आहे. या ३ दिवसांत मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबासमवेत रहातील. त्या कालावधीत ते कुठल्याही शासकीय कार्यक्रमांना उपस्थित रहाणार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमारस्वामी यांनी यापूर्वीही टिपू सुलतानच्या जयंतीला विरोध केला होता. तथापि काँग्रेससमवेत सत्तेत आल्यानंतर त्यांनी यंदा उघडपणे विरोध केलेला दिसून आला नाही. टिपूच्या जयंतीवरून चालू असलेल्या वादाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना कुमारस्वामी म्हणाले, मी टिपूची जयंती साजरी करा किंवा करू नका, असे कधीही म्हटलेले नाही. देशात अनेक जाती-धर्मांचे लोक रहातात. त्यांना त्यांच्या नेत्यांची जयंती साजरी करण्याची इच्छा असते. जर कुणाला (भाजपला) अशा कार्यक्रमांत सहभागी व्हायचे नसेल, तर त्यांनी होऊ नये. (अशा आक्रमकांच्या जयंत्या काँग्रेस सरकार जनतेच्या पैशांतून का साजरी करते ? त्यासाठी ते खिशातील पैसे का वापरत नाहीत ? इस्लामी आक्रमकांच्या स्मृती कायमच्या पुसण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन !
टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या काँग्रेस आणि संयुक्त जनता दल आघाडी सरकारच्या निर्णयाच्या विरोधात भाजपने राज्यव्यापी आंदोलन केले. (केंद्रात स्वपक्षाचे सरकार सत्तेत असूनही भाजपला जर विरोधकांसारखे आंदोलन करावे लागत असेल, तर भाजपला सत्तेत बसवून उपयोग काय, असे हिंदूंना वाटल्यास चूक काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात