चेन्नई : तमिळनाडूच्या तिरुनेलवेलीमधील पपनासम येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ताम्रबरानी पुष्कर सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीने सहभाग घेतला होता. श्री रामानंद स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली ‘अखिल भारत थुरावियर मनाडू’ने हा १२ दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणविषयक प्रदर्शन, तसेच ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी श्रीमती कृष्णावेणी आणि सौ. कल्पना बालाजी यांनी आचारधर्म, साधना, नामजप आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी १२ दिवसांच्या कालावधीत विविध प्रकारची सेवा केली. यामध्ये पू. (सौ.) उमा रविचंद्रन्, श्री. काशीनाथ शेट्टी, श्री. प्रभाकरन्, श्रीमती कृष्णावेणी, श्री. कन्नान्, श्री. नंदू, श्री. जयकुमार, श्री. सरवनन्, श्री. बालाजी, सौ. कल्पना बालाजी आदींनी सहभाग घेतला. या कालावधीत साधकांना अनेक अनुभूती आल्या. पवित्र तामिराबरानी नदीमध्ये स्नान करण्याची संधी साधकांना मिळाली. या वेळी साधकांना पुष्कळ चैतन्य मिळाले. त्याविषयी साधकांनी तामिराबरानी नदीविषयी कृतज्ञता व्यक्त केली.