Menu Close

खडपोली, चिपळूण येथील श्री मारुति मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशात प्रतिदिन सहस्रो गायींची हत्या केली जाते, हे हिंदूंकरता लज्जास्पद ! – श्री. मनोज खाडये

चिपळूण : भारतात गोमांस निर्यातीत गुलाबी मांसाच्या (पिंक रिव्हॉल्युशनच्या) नावाखाली प्रचंड आर्थिक उलाढाल केली जात आहे. परदेशात गुलाबी मांसाला विपुल मागणी आहे. यासाठी गायीला ७-८ दिवस चारा-पाण्यावाचून उपाशी ठेवले जाते. आठव्या-नवव्या दिवशी गाय तडफडू लागते. त्या वेळी तिच्या शरिरातील मांस तिचे रक्त शोषून घेते. त्यामुळे ते मांस गुलाबी होते. त्यानंतर त्या तडफणार्‍या गायीवर ३५० सेन्टीग्रेड तापमानाच्या गरम पाण्याचा फवारा मारला जातो. त्यामुळे तिची कातडी गळून पडते. इतक्या क्रूर पद्धतीने गायीची हत्या आज आर्थिक उलाढालीसाठी केली जात आहे. भारत आज जगात सर्वाधिक गोमांस निर्यात करणारा देश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशात प्रतिदिन सहस्रो गायींची हत्या होते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गुजरात राज्याचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी त्यांच्या मार्गदर्शनात केले.

चिपळूण येथील दसपटी विभागातील निवडक संघटक धर्मप्रेमींकरता खडपोली येथे श्री मारुति मंदिरात हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा आणि त्यातील धर्मप्रेमींच्या सहभाग या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी खडपोली येथील श्री. नीलेश बळीराम कदम, श्री. ऋषिकेश प्रदीप कदम, श्री. दीपक अनंत कदम, कु. ऋतिक प्रदीप कदम, दादर येथील पांढरी काशिनाथ लाड, श्री. ऋषिकेश प्रभाकर सकपाळ, वलोटी येथील श्री. अक्षय विश्राम चव्हाण, तिवरे येथील उपसरपंच श्री. तानाजीराव चव्हाण, पिंपळी येथील श्री. राजेश लक्ष्मण घाडी आदी २८ धर्मप्रेमींनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. सचिन सकपाळ, श्री. जगदीशचंद्र यादव, श्री. जयवंत शिंदे हे उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *