Menu Close

भाजपशासित हरियाणातील बाबा गोरखनाथ मंदिराच्या महंतांची निर्घृण हत्या

‘भाजप आतंकवाद्यांपासून ना सैनिकांना वाचवू शकतो, ना हिंदुद्वेष्ट्यांपासून हिंदुत्वनिष्ठांना वाचवू शकतो, ना डाव्यांपासून स्वपक्षाच्या नेत्यांना वाचवू शकतो, ना गुंडांपासून सामान्य जनतेला वाचवू शकतो ! मग अशा भाजपला निवडून देऊन उपयोग काय’, असा प्रश्‍न हिंदूंना पडला, तर त्यात चूक काय ?

रोहतक (हरियाणा) : येथील बाबा गोरखनाथ मंदिराचे महंत विजय (वय ५० वर्षे) यांची अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. १२ नोव्हेंबर या दिवशी एक व्यक्ती झज्जर-बादली या रस्त्यावरून जात असतांना तिला माजरा गावाजवळ एका निर्मनुष्य जागेत रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह पडल्याचे आढळून आले. त्या व्यक्तीने या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांना तो महंत विजय यांचा मृतदेह असल्याचे समजले. त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून सदर शस्त्र जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध चालू केला आहे.

महंत विजय, बाबा गोरखनाथ मंदिरात एकटेच रहात होते. ते मूळचे भदानी या गावचे होते. ते अनुमाने एक वर्षापासून या मंदिराचे महंत होते. या मंदिराचे संस्थापक पंचल नाथ यांनी समाधी घेण्यापूर्वी मंदिराचे दायित्व महंत विजय यांच्याकडे सोपवले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *