हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत आंबडस येथे चर्चासत्र
चिपळूण : देश स्वतंत्र झाला तेव्हा येथे असलेल्या एकूण ५६८ संस्थांनांपैकी केवळ २ संस्थाने मुसलमान शासकांच्या अधिपत्याखाली होती. उर्वरित सर्व संस्थाने हिंदु शासकांची होती. त्यामुळे या देशाची घटना सिद्ध करतांना त्यात ‘हा देश धर्मनिरपेक्ष म्हणून घोषित व्हावा’, हा नेहरूंचा चाललेला अट्टाहास सरदार वल्लभभाई पटेल आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठाम वस्तूनिष्ठ धोरणांमुळे पूर्णत्वास जाऊ शकला नाही. बहुसंख्यांक हिंदू असलेल्या देशाला धर्मनिरपेक्ष घोषित केल्यास पुनः एका फाळणीला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी या दोघांनीही नेहरू यांना दिली होती; मात्र नेहरूंची ही इच्छा वर्ष १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांनी ४२ वी घटनादुरुस्ती करून पूर्ण केली. घटनेमधील ही धर्मनिरपेक्षतेची घुसवणूक हे हिंदूंचे धार्मिक अस्तित्व संपवण्यासाठीचे षड्यंत्र आहे, हे आता हिंदूंनी समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गुजरात राज्याचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.
हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत आंबडस येथे श्री. जयंत मोरे यांच्या मंगल कार्यालयात तेथील पंचक्रोशीतील निवडक संघटक धर्मप्रेमींकरता चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी आंबडस, चिरणी, भेलसई, साखर, धामणंद आणि काडवली या गावांतून धर्मप्रेमी संघटक उपस्थित होते.
या चर्चासत्रात सरपंच रमेश पांडुरंग मजलेकर, धर्मप्रेमी सर्वश्री आनंद कदम, गणेश उतेकर, सुरेश देवरुखकर, अनिकेत म्हापदी, दयानंद म्हापदी, वसंत रामाणे, संतोष कालप यांनी सहभाग घेतला. येथून पुढे या पंचक्रोशीत हिंदु राष्ट्र संघटन कार्याचा प्रसार करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार चर्चासत्रात सहभागी झालेल्या धर्मप्रेमींनी व्यक्त केला.