कुठे भारतीय सैनिकांविषयी विश्वास दाखवणारा संयुक्त राष्ट्र संघ, तर कुठे आपल्याच सैनिकांना बलात्कारी ठरवणारा देशद्रोही साम्यवादी कन्हैया कुमार !
संयुक्त राष्ट्र : आफ्रिकी देशांत चालू असलेल्या शांतता मोहिमेत काही आफ्रिकी देशांनी शांती सैनिकांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघाने स्पष्ट केले आहे की, लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झालेल्या शांती सैनिकांमध्ये भारतीय सैनिकांचा समावेश नाही. त्यांनी भारतीय सैनिकांना याप्रकरणी निर्दोष घोषित केले आहे.
वर्ष २०१५ मध्ये ६९ देशांकडून संयुक्त राष्ट्रांकडे शांती सैनिकांच्या विरोधात लैंगिक अत्याचारांच्या ९९ तक्रारी आल्या होत्या. त्यात एकही भारतीय सैनिक नाही. भारताचे ७ सहस्र ७९८ शांति सैनिक जगातील १० देशांमधील शांतता मोहिमेत सहभागी आहेत. वर्ष २०१५ मध्ये कांगो, मोरक्को, दक्षिण आफ्रीका, कॅमरून, रवांडा आणि टांझानिया या देशांतील शांती सैनिकांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्र संघाने केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात