तृप्ती देसाई यांची ‘स्टंट’बाजी चालूच !
पुणे : भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी १७ नोव्हेंबरला शबरीमला मंदिरात जाणार असून त्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन् यांना पत्र लिहिले आहे. तृप्ती देसाई यांच्या समवेत ६ महिलाही असल्याने त्यांनी सुरक्षेची मागणीही केली आहे. या मंदिरात ११ वर्षांखालील मुलींना आणि ५० वर्षांच्या पुढील महिलांना येण्यास प्रतिबंध नाही. त्यामुळे तृप्ती देसाई तेथे गेल्यावर काय घडते, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यावरही महिलांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यास प्रतिबंध करण्यात आला. या प्रकरणी पुनर्विचार याचिकाही सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात