सनातनच्या साधकावरील प्राणघातक आक्रमणाचे प्रकरण
जळगाव : सनातन संस्थेचे कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली) येथील साधक श्री. संतोष चव्हाण यांच्यावर २० डिसेंबर या दिवशी सकाळी धर्मांध मुसलमान आक्रमकांनी प्राणघातक आक्रमण केले. या धर्मांध मुसलमानांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, याकरिता शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी विनंती हिंदु जनजागृती समितीने केली आहे. श्री. उद्धव ठाकरे येथे एका कार्यक्रमासाठी आले असता, त्यांना समितीचे सर्वश्री उदय बडगुजर, दत्तात्रय वाघुळदे, विजय पाटील आणि कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी निवेदन दिले. या वेळी श्री. ठाकरे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की,
१. श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी सनातनवर मनमानी आरोप करत सातत्याने सनातनच्या विरोधात चिथावणीखोर विधाने केली.
२. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्याने फेसबूकवर सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना ठार करण्याची धमकी दिली होती.
३. कवठेमहांकाळ परिसरात डॉ. पाटणकर यांच्या श्रमिक मुक्ती दलाचे प्राबल्य असल्याने हे आक्रमण डॉ. पाटणकर यांच्या चिथावणीमुळेच झाल्याचे स्पष्ट होते.
४. धर्मांध मुसलमानांनीच श्री. चव्हाण यांच्यावर आक्रमण करून श्री. चव्हाण यांच्याच विरोधात खोटी तक्रार दिली आहे.
५. या प्रकरणी स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिराज मुजावर यांच्याकडून भेदभाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
६. त्यामुळे सातत्याने सनातनला धमक्या देणारे डॉ. भारत पाटणकर, मुसलमानांना पाठीशी घालणारे संबंधित, आक्रमण करणारे धर्मांध मुसलमान आणि त्यांचे पाठीराखे यांच्यावर कारवाई होण्यासाठी आपण लक्ष घालावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात