पेण : येथील तरणखोप गावात असणार्या श्री साईबाबा मंदिराच्या सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होणार्या धर्मप्रेमींसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात हिंदु राष्ट्र म्हणजे काय? ते कसे असेल ? त्यासाठी आपण सत्सेवा करण्याचे महत्त्व यांविषयी समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी मार्गदर्शन केले, तसेच जीवनात सतत आनंदी रहाण्यासाठी आणि शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व या विषयावर सनातन संस्थेच्या सौ. मोहिनी मांढरे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत आध्यात्मिक त्रास कसे ओळखायचे? आणि त्यावरील आध्यात्मिक उपाय कसे करायचे ? याविषयी सौ. अर्पिता पाठक यांनी सांगितले.
क्षणचित्रे
१. राष्ट्र आणि धर्म यांच्याशी निगडीत सेवेतील प्रत्यक्ष सेवांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
२. आध्यात्मिक उपाय केल्यावर आवरण दूर होऊन उत्साहात वाढ झाल्याचे धर्मप्रेमींनी अनुभवले.
0 Comments