(सरळांबेगाव) शहापूर (जिल्हा ठाणे) : हिंदूंचा राजा म्हटले की प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येते. त्यांचे चरित्र शाळेतून शिकवले जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझालखानाचा कोथळा बाहेर काढून शौर्य गाजवले. महाराजांनी मूठभर मावळ्यांना एकत्र करून पाच पातश्याह्या उद्ध्वस्त केल्या आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपल्याला शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास शिकवला जात नाही. तो जाणीवपूर्वक लपवला जातो. हिंदुत्वपासून हिंदूंना दूर ठेवण्यासाठी खरा इतिहास शिकवला जात नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश मुळीक यांनी सरळांबेगाव, शहापूर येथे ‘मौर्य बॉईज’च्या वतीने आयोजित शौर्य जागरण कार्यक्रमात केले. या वेळी ४० धर्मप्रेमी युवक उपस्थित होते. तसेच या कार्यक्रात स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रत्याक्षिकेही दाखवण्यात आली.
श्री. मुळीक पुढे म्हणाले की, काही हिंदु १ जानेवारी नवीन वर्ष म्हणून साजरे करतात. आपली हिंदु संस्कृती महान असतांना आपण पाश्चात्य संस्कृतीकडे वळत चाललो आहोत. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आज हिंदू पाश्चात्य कुसंस्कृतीचे अनुकरण करतात. यासाठी हिंदु जनजागृती समिती हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण करण्याचे काम करत आहे.