Menu Close

यावल (जळगाव) येथे ’हिंदु राष्ट्र संघटक’ कार्यशाळा !

हिंदु राष्ट्र स्थापनेची मुहूर्तमेढ रोवण्यास यावल येथील धर्माभिमानी कटिबद्ध !

यावल (जळगाव) : येथे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने ‘हिंदु राष्ट्र संघटक’ कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेस यावल शहरासह आजूबाजूच्या ७ गावांतून २०० धर्माभिमानी उपस्थित होते. ही कार्यशाळा महर्षी व्यास यांनी महाभारताचे पहिले पान लिहिले, त्या व्यास मंदिराच्या सभागृहात पार पडली. कार्यशाळेचा प्रसार स्थानिक धर्माभिमान्यांनीच केला. तसेच लागणारे सर्व साहित्य येथील धार्माभिमानी तरुणांनी उपलब्ध करून दिले होते. या कार्यशाळेत समिती समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर आणि कु. रागेश्री देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.

भ्रष्ट आणि शोषित व्यवस्था पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन म्हणून हिंदूंची मंदिरे पाडली जातात. दुसरीकडे अफझलखानाच्या थडग्याच्या सुशोभिकरणासाठी अनधिकृतरित्या बळकावलेली वन विभागाची भूमी कह्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले असतांना त्यावर प्रशासन मूग गिळून गप्प बसते. न्यायालय, सैन्यातील अधिकार्‍यांना कपडे धुण्यासाठी सहस्र रुपयांचा निधी मिळतो, ७ व्या वेतन आयोगाने शिक्षकांसाठी १०८ प्रकारच्या सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. शेतकर्‍याला मात्र कोणताही आयोग नाही, तर वाढीव वेतन नाही. वर्ष १९७० नंतर शिक्षकांचे वेतन २५० पटीने वाढले. त्या प्रमाणात शेतमालाचे दर वाढले का ? ही भ्रष्ट आणि शोषित व्यवस्था पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे.

महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता ! – कु. रागेश्री देशपांडे, नंदुरबार-धुळे जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

दुष्टांचा संहार करणारी दुर्गा, चंडी, काली या हिंदु धर्मातील देवींचा आदर्श आपल्यासमोर असतांना हिंदु तरुणींनी अबला नव्हे, तर सबला बनून जिहादींचा सामना करून आपले शौर्य गाजवले पाहिजे; कारण धर्मांधांकडून ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ यांसारखे १४ प्रकारचे जिहाद केले जात आहेत. यात लाखो हिंदु तरुणींचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. देशात दर १४ मिनिटाला एक बलात्कार, तर दर २४ मिनिटाला एका स्त्रीवर अत्याचार होत आहे. स्वतःचा आत्मसन्मान जपण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चालू करण्यात येणार्‍या निःशुल्क स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात महिलांनी प्रशिक्षण घ्यावे !

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *