उरण (जिल्हा रायगड) : हिंदु धर्मावर होणार्या विविध संकटांच्या विरोधात हिंदूंना जागृत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आवरे येथे हिंदु राष्ट्रजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे आणि सनातन संस्थेच्या सौ. मोहिनी मांढरे यांनी उपस्थित धर्मप्रेमींना संबोधित केले. याचा लाभ गावातील २०० हून अधिक राष्ट्रप्रेमींनी घेतला.
या वेळी श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले, ‘‘या देशात हिंदूंना कायदे आणि अन्य धर्मियांना फायदे असे चालू आहे. हज यात्रेचे अनुदान बंद करून अल्पसंख्यांक मुलींच्या विवाहासाठी ‘शादी शगून’ योजना चालू करून सरकारने हिंदूंच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. धर्मांतराचे प्रमाण वाढले आहे. या सगळ्या समस्यांवर एकच पर्याय म्हणजे हिंदू राष्ट्राची स्थापना करणे. यासाठी आपण सर्व जण एकत्रित येऊन प्रयत्न करायला हवेत.’’
सनातन संस्थेच्या सौ. मोहिनी मांढरे यांनी उपस्थितांना जीवनातील साधनेचे महत्त्व, कोणती उपासना करावी याविषयी मार्गदर्शन केले.
वैशिष्ट्यपूर्ण !
१. सभागृहाच्या बाहेर कर्णे लावले होते, तेथूनही साधारण १२५ तरुणांनी सभेचा विषय ऐकला
२. गावातील सर्व पक्षीय लोक सभेला एकत्रित आले, याविषयी सर्व जण समितीचे कौतुक करत होते !