कर्नाटकात हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांची सरकार नोंद घेत नाही ! – कोनेरी कुम्रतवाडकर, हिंदु जनजागृती समिती
बेळगाव : हिंदूंवर होणार्या आघातांविषयी निषेध फेरी काढायलाही कर्नाटक सरकार अनुमती देत नाही. याउलट कर्नाटकात अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्या; परंतु सरकार त्याची नोंद घेत नाही. अनेक हिंदुत्वनिष्ठांंना नाहक अटक करण्यात येऊन हिंदुत्वाचे कार्य होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्न करते, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे श्री. कोनेरी कुम्रतवाडकर यांनी व्यक्त केले. ते देसूर (बेळगाव) येथील हिंदु राष्ट्रजागृती सभेत बोलत होते. या सभेसाठी १२० धर्मप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. कोनेरी कुम्रतवाडकर यांचे स्वागत ह.भ.प. सुभाष परीट यांनी, तर सनातन संस्थेच्या सौ. उज्वला गावडे यांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्या सौ. रेणुका बाळकृष्ण पाटील यांनी केले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. उज्वला गावडे म्हणाल्या, ‘‘सध्या भारतात इतर धर्मियांकडून आपली संस्कृती आणि शास्त्र संपवण्याचे षड्यंत्र चालू आहे. युवकांवर संस्कार न केल्याने ते पेहराव, बोलणे पाश्चात्त्य संस्कृतीनुसार करत आहेत. त्याकडे लक्ष देऊन आपल्या धर्माचे महत्त्व पटवून देऊन त्यांना धर्माचरणी बनवून आदर्श बनवले पाहिजे.’’