Menu Close

बेळ्तंगडी (दक्षिण कन्नड) येथे दीपावलीनिमित्त हिंदु युवा संगम कार्यक्रम

जिजाऊंप्रमाणे प्रत्येक आईने आपल्या मुलाला हिंदवी स्वराज्याच्या संकल्पना असलेले शिक्षण द्यायला हवे ! – गुरुप्रसाद गौडा, हिंदु जनजागृती समिती

बेळ्तंगडी (दक्षिण कन्नड, कर्नाटक) : प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे आईने केलेले संस्कार असतात. ज्याप्रमाणे जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले, तसेच प्रत्येक आईने आपल्या मुलांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आवश्यक ते संस्कार केले पाहिजेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी केले. आदि शक्ती हेल्पिंग हॅण्डस्, नेरिय यांच्या वतीने दीपावलीनिमित्त बेळ्तंगडी तालुक्यातील अणियुरू मैदानात हिंदु युवा संगम कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून समितीचे श्री. गुरुप्रसाद गौडा उपस्थित होते, तर मुख्य अतिथी म्हणून बेेळ्तंगडीचे आमदार श्री. हरीश पूंजा हे उपस्थित होते.

श्री. गुरुप्रसाद गौडा म्हणाले, ‘‘हिंदूंनी गायीला विश्‍वमातेचे स्थान दिले असून ती आपल्या पोषणाचे कार्य करते. त्यामुळे तिचे रक्षण करण्याचे कार्य आपण केले पाहिजे. भारतीय शिक्षणपद्धत हिंदु धर्माच्या पायावर उभी राहू नये, यासाठी ब्रिटिशांनी मेकॉले शिक्षणपद्धत चालू केली. त्याच शिक्षणामुळे हिंदू धर्मशिक्षणापासून वंचित राहिले. पूर्वी परकियांनी आपल्या देशावर आक्रमण केले, त्याच पद्धतीने आज अन्य पंथीय हिंदूंवर विविध प्रकारे आक्रमण करत आहेत. त्यांचे प्रयत्न विफल करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हा एकमेव पर्याय आहे.’’

‘आपण देशाला मातृस्थान देतो. ही संकल्पना आपण केवळ भारतातच पाहू शकतो. दीपावली साजरी करण्याच्या सध्याच्या पद्धतीमुळे हा सण त्याचे सौंदर्य हरवून बसला आहे. आपण आपल्या संस्कृतीचे रक्षण करून ती वाढवण्याचे कार्य केले पाहिजे. पालकांनी मुलांना सुसंस्कार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे’, असे बेळ्तंगडी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. हरीश पूंजा यांनी सांगितले.

या वेळी व्यासपिठावर भाजपचे उजिरे शक्तीकेंद्राचे अध्यक्ष श्री. बाबू गौडा, विश्‍व हिंदु परिषद, बेळ्तंगडीचे कार्यदर्शी श्री. नवीन, हिंदु युवा संगमचे अध्यक्ष श्री. गिरीश आणि धर्मप्रेमी श्री. प्रमोद दिडुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *