- अशा प्रकारे हिंदूंना धमक्या द्यायला हा पाकिस्तान आहे का ?
- भाजपच्या राज्यात श्रीरामाचे चित्र लावले; म्हणून हिंदूंना पोलिसांसमोर ठार मारण्याची धमकी देणारे धर्मांध किती उद्दाम आणि हिंदुद्वेषी आहेत, हे दिसून येते. हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवू पहाणारे आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे पुरोगामी, धर्मनिरपेक्षवादी आणि प्रसारमाध्यमे आता गप्पच रहातील, यात शंका नाही !
- हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात तत्परतेने एकत्र आलेल्या नालासोपारा येथील धर्मप्रेमींचा आदर्श सर्वत्रच्या हिंदूंनी घ्यावा !
नालासोपारा : येथे विश्व हिंदु परिषदेच्या वतीने २५ नोव्हेंबरला घेण्यात येणार्या ‘श्रीराम मंदिर निर्माण संकल्प सभे’चे भीत्तीपत्रक लावत असलेल्या हिंदूंना स्थानिक धर्मांधांनी ‘यहां श्रीराम का नारा दिया, तो काट डालेंगे’, अशी धमकी दिली. (हिंदूबहुल वस्तीतही धर्मांध हे हिंदूंना अशा धमक्या देण्याचे धाडस करतात. यावरून त्यांचा वाढता उद्दामपणा लक्षात येतो. धर्मांधांची ही हिंदुद्वेषी मानसिकता ओळखून किती हिंदू सावध असतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. हा प्रकार २२ नोव्हेंबरच्या रात्री ९.३० वाजता घडला. यानंतर हिंदू तुळींज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी येऊनही धर्मांधांनी हिंदूंना धमकी दिली. (हिंदूंनो, पोलीस दंगलखोर धर्मांधांवर कठोर कारवाई करत नसल्यामुळेच धर्मांध पोलीस ठाण्यात येऊन हिंदूंना धमकावतात, हे जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. या गंभीर प्रकार कळताच अवघ्या ३० मिनिटांत या परिसरातील शेकडो हिंदू घटनास्थळी एकत्र आले. हिंदूंची संख्या पाहून धर्मांधांनी तेथून पळ काढला. (ही आहे हिंदूंच्या संघटितपणाची शक्ती ! हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात तत्परतेने एकत्र येणार्या नालासोपारा येथील हिंदूंचा समस्त हिंदूंनी आदर्श घ्यावा. हिंदूंनी सर्वत्रच अशा प्रकारे संघटन दाखवल्यास हिंदु राष्ट्राची पहाट दूर नाही ! संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. संघटित हिंदूंनी तुळींज पोलीस ठाण्यावर जाऊन धमक्या देणार्या धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी केली; मात्र पोलिसांनी नेहमीप्रमाणेच धर्मांधांच्या विरोधात कारवाई करण्याविषयी बोटचेपी भूमिका घेतली. (सर्व यंत्रणा हाताशी असतांना पोलीस कोणाला घाबरतात ? सरकारचा त्यांच्यावर दबाव असतो का ? पोलीस ठाण्यात अरेरावी करणार्या धर्मांधांवरही पोलीस गुन्हे नोंद करत नाहीत. त्यामुळे आता हिंदूंना स्वतःचा दबावगट निर्माण करणे आवश्यक आहे, असे वाटले, तर चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. या प्रकारामुळे नालासोपारा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
५. भारतीय जनता पक्षाच्या गुजराती मोर्च्याचे नालासोपाराचे अध्यक्ष श्री. नीलेश खोकाणी आणि त्यांचे सहकारी नालासोपारा रेल्वेस्थानकाच्या जवळ ‘श्रीराम मंदिर निर्माण संकल्प सभे’चे भित्तीपत्रक लावत होते. त्या वेळी त्या ठिकाणी जलील शेख याच्यासह अन्य धर्मांध आले. त्यांनी भित्तीपत्रक लावणार्या श्री. नीलेश खोकाणी आणि त्यांच्या सहकार्यांना ठार मारण्याची धमकी दिली.
६. या धमकीनंतर श्री. खोकाणी आणि त्यांचे सहकारी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्यावर तेथे जाऊनही जलील शेख आणि अन्य धर्मांध यांनी पुन्हा हिंदूंना धमकी दिली. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक आणि अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी आले. कोणता अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात