दिवसभर नागरिकांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास !
‘हिंदूबहुल देशात हिंदूंसाठी कायदा, तर अल्पसंख्यांकांसाठी सवलत’ अशा वृत्तीचे पोलीस प्रशासन ! हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे भाजप शासन अशा पोलिसांवर कारवाई करणार का ?
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) : येथे ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने २१ नोव्हेंबर या दिवशी आझाद चौकात सकाळी ६.३० वाजल्यापासून मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपकावर गाणी लावण्यात आली होती. दुपारच्या सत्रात भाषण स्पर्धा घेण्यात आल्या, त्यांचाही आवाज मोठाच होता. दिवसभर चालू असणारा ध्वनीक्षेपक रात्री १२ नंतरही चालू होता. अखेर एका नागरिकाने रात्री १२ नंतर केलेल्या तक्रारीची नोंद घेऊन ध्वनीक्षेपक बंद करण्यात आला. (सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही त्याची कार्यवाही न करणारे, तसेच नागरिकांनी तक्रार नोंदवल्यावरही त्याची नोंद न घेणारे पोलीस जनतेला कायद्याचे राज्य काय देणार ? हेच पोलीस प्रशासन हिंदूंच्या सणांमध्ये कायद्याचा बगडा दाखवत रात्री १० नंतर ध्वनीक्षेपक बंद करण्यास भाग पाडते, तर अन्य धर्मियांच्या वेळी कारवाई करण्याची वेळ आल्यावर केवळ बघ्याची भूमिका घेते ! हिंदूंनो, अशा पोलिसांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रारी नोंदवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. या संदर्भात नागरिकांनी पोलिसांना कळवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी ‘लँडलाईनचा रिसीव्हर’ काढून ठेवला आहे, असे अनेक नागरिकांना समजले.
२. रात्री १२ नंतर एका नागरिकाने पोलीस ठाण्यात दूरभाष केला असता पोलिसांनी ‘आता कार्यक्रम संपला असून आता आवाज येणार नाही’, असे खोटे सांगितले. यावर त्या नागरिकाने ‘मी त्या परिसरातील रहिवासी असून अजूनही आवाज चालूच आहे’, असे पोलिसांना सांगितले. यावर त्या पोलिसाने तेथील परिसरात असणार्या पोलिसाचा संपर्क क्रमांक देऊन त्याला संपर्क करण्यास सांगितले. (अशी उत्तरे पोलिसांनी कधी अन्य धर्मियांना दिली असती का ? तसेच हिंदूंच्या सणांच्या वेळी ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास पोलिसांनी कधी रात्री १२ नंतर अनुमती दिली असती का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यावर नागरिकाने त्या भागात बंदोबस्तासाठी तैनात असणार्या सदरच्या पोलिसास संपर्क केला असता त्यानेही कार्यक्रम संपला असल्याचे खोटे सांगितले. नागरिकाने ‘भ्रमणभाषमधून ध्वनीक्षेपकाचा आवाज येत आहे’, हे सांगितल्यावर त्याने कार्यक्रम त्वरित थांबवला. (असे खोटे बोलून कायद्याची पायमल्ली करणार्या पोलिसांविषयी त्यांच्या नावासहित वरिष्ठांकडे तक्रार नोंदवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात