Menu Close

धर्मांतराचे धर्मसंकट !

हिंदु समाजाचे धर्मांतर करण्याचे अहिंदूंचे सुनियोजित कटकारस्थान हिंदु धर्माला पोखरत आहे. धर्मांतरासाठीच्या काही घटनांनी ‘धर्मांतर’ या विषयाकडे गांभीर्याने पहाण्याची वेळ आली आहे. कल्याणच्या मुख्य बाजारपेठ परिसरात धर्मांधांकडून विविध भाषांतील एका धार्मिक पुस्तकाचे हिंदूंना वाटप करण्यात येत होते. अनुमाने २ सहस्र पुस्तकांच्या प्रतीही तेथे होत्या. कल्याण येथेच १४ नोव्हेंबरला आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय बाळदिन महोत्सवा’च्या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका पाहिल्यावर ख्रिस्ती पंथाच्या प्रसाराचा हिंदूंच्या धर्मांतराचा छुपा उद्देशही उघड झाला होता. शेवटी हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे आयोजकांना कार्यक्रमास नकार द्यावा लागला. अंदमान द्वीप येथे आदिवासींमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी अमेरिकी धर्मप्रचारक गेला होता. धर्मांतराचा विळखा दिवसेंदिवस किती आवळला जात आहे, हेच या घटनांमधून प्रकर्षाने दिसून येते. ‘निसर्गसिद्ध हिंदूंचे विश्‍व एकप्रकारे ओरबाडून काढण्याचाच हा प्रकार आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

धर्मांतराचा काळा इतिहास

आजवर औरंगजेब, महंमद कासीम, टिपू सुलतान, वास्को द गामा, सेंट झेव्हियर्स, चार्ल्स ग्रँट, लॉर्ड मेकॉले या सर्वांनीच धर्मांतराचे दुष्कृत्य घडवून आणले. त्यामुळे हिंदूंसाठी हा एकप्रकारे काळा इतिहासच म्हणावा लागेल. ‘संपूर्ण आशिया खंडच जणू ख्रिस्ती होण्यासाठी तळमळत आहे’, अशा आविर्भावात देशातील विविध राज्यांत सहस्रोंच्या संख्येने कार्यरत असणार्‍या ख्रिस्ती मिशनरींमुळे या इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. काही वर्षांपूर्वीही एकट्या गुजरातमध्ये धर्मांतर करण्यासाठी राज्यशासनाकडे १ सहस्र ८३८ आवेदने आली होती. त्यांतील १ सहस्र ७३५ म्हणजे ९४.४ टक्के आवेदने ही केवळ हिंदूंची होती. केरळमध्ये तर प्रत्येक मासाला जवळजवळ १०० ते १८० तरुण महिलांचे धर्मांतर होते. हे सर्वच अतिशय खेदजनक आहे. समाजात वंदनीय मानल्या जाणार्‍या मदर तेरेसा यांचाही तोंडवळ्यामागील मुखवटा धर्मांतराच्या षड्यंत्राचा होता, हे वास्तवही विसरून चालणार नाही; मात्र तरीही मदर तेरेसा यांना संत ठरवून ‘भारतरत्न’ दिला जातो, हे केवढे मोठे दुर्दैव ! अशा प्रकारे कपटी ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून दाखवण्यात येणार्‍या ऐहिक लाभाच्या प्रलोभनांमुळे धर्मांतराचे प्रकार वाढतच आहेत. त्याला आळा घालणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास संपूर्ण आशिया खंड ख्रिस्तीमय झाल्यास नवल ते काय ? भारताच्या राजकारणात व्हॅटिकन चर्चचाही सहभाग असल्याचे म्हटले जाते, हीसुद्धा गांभीर्याने विचार करण्याचीच गोष्ट आहे.

हा संपूर्ण इतिहास पहाता धर्मांतराच्या षड्यंत्राद्वारे धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व लबाडीने वापरून भारताच्या एकात्मतेला धोका निर्माण केला जात आहे. धर्मांतरितांची मानसिकताही राष्ट्रविरोधी असल्याने त्यातून अंतर्गत निष्ठा नष्ट होत आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश ही राष्ट्रे धर्मांतराचीच अपत्ये आहेत; कारण गेल्या एक सहस्र वर्षांत तलवारीच्या बळावर धर्मांतर झाले नसते, तर हे तिन्ही देश आज भारतभूमीचेच भाग राहिले असते. देशातील सर्वांत मोठे ख्रिस्ती राज्य म्हणून नागभूमी (नागालँड) ओळखले जाते. मिझोराम, मेघालय, मणीपूर ही राज्येही त्याच्याच पावलावर पाऊल टाकत ख्रिस्तीबहुल होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वांचल भारतावर ओढवलेली ही स्थिती म्हणजे देशासाठी एकप्रकारे कलंकच म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरही म्हणजे नेपाळ, मलेशिया येथे होणारे वाढते धर्मांतर हिंदूंसाठी चिंताजनक आहे. हिंदूंचे अशाच प्रकारे वेगाने धर्मांतर होत राहिल्यास १०० वर्षांनी ‘पारशी पंथ होता’, असे ज्याप्रमाणे आता म्हणतात, त्याप्रमाणे ‘हिंदु धर्म होता’, असे म्हणायची वेळ येईल आणि हिंदूंच्या माथी अल्पसंख्यांक म्हणून ठपका बसेल ! धर्मांतरामुळे हिंदूंच्या शत्रूंच्या संख्येत वाढ होत आहे, याकडेही दुर्लक्षून चालणार नाही; कारण त्याचीच परिणती हिंदूंवर होणारे वाढते अत्याचार, त्यांच्या हत्या, वंशविच्छेद यांत होते.

धर्मांतरावर बंदी आणणेच श्रेयस्कर !

हिंदूंची पुढील पिढी अहिंदु होऊ नये, यासाठी धर्मांतराचे आक्रमण हिंदूंनीच परतवून लावायला हवे. कल्याणच्या घटनेप्रमाणेच आज सर्वत्रचे हिंदुत्वनिष्ठ हिंदूंवरील आघातांच्या विरोधात कृतीशील होत आहेतच; मात्र केंद्र सरकारनेही धर्मांतरबंदीचा कठोर कायदा लवकरात लवकर करण्याची आवश्यकता आहे. राज्यघटनेमध्ये धर्मांतराचे कलम तत्कालीन नेत्यांच्या नेभळटपणामुळे आले असल्याने राज्यघटनेतही दबाव, फसवणूक आणि अनैतिक मार्गाने धर्मांतर होणार नाही, परकियांना धर्मप्रसार करता येणार नाही, असा पालट करणे उचित ठरेल. ख्रिस्ती मिशनर्‍यांनाही हाकलून देणे आवश्यक आहे. चर्चकडे येणार्‍या विदेशी निधीचा मोठ्या प्रमाणातील ओघ थांबवण्यासह धर्मांतराच्या हेतूने चालणार्‍या वैद्यकीय सेवांवरही बंदी आणायला हवी. ख्रिस्ती मिशनरी आणि काही शाळा यांसारखे बुद्धीभेद करून धर्मांतर घडवणारे मोठे कारखाने बंद करायला हवेत. तसेच धर्मांतराला विरोध करणार्‍या श्रीलंका, जपान या राष्ट्रांकडूनही भारताने शिकायला हवे. या उपाययोजनांचा अवलंब केल्यास धर्मांतरावर थोडेफार नियंत्रण येईल; मात्र धर्मांतरावर पूर्णतः बंदी आणण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *