वर्धा : शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करावा, तसेच या मंदिरातील धर्मपरंपरा जपण्यासाठी आंदोलन करणार्या आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत. या समवेतच केरळमधील ननवर बलात्काराचा आरोप असलेले बिशप फ्रॅन्को मुलक्कल याचा जामीन रहित करावा आणि या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेल्या फादर कुरियाकोस यांच्या हत्येचे सखोल अन्वेषण करावे, या मागण्यांसाठी स्थानिक विकास भवनसमोर २२ नोव्हेंंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. यानंतर स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रभारी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनुप चौधरी, श्री. हितेश निखार, श्री. शिवा थोटे, सनातन संस्थेच्या सौ. विजया भोले, सौ. वनिता किरसान, सौ. रेखा हस्ती, सौ. मंदाकीनी डगवार आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.