अशी चेतावणी द्यावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद ! हिंदूंनो, आत्मदहन करून सरकारला जाग येणार नाही, हे लक्षात घ्या आणि तुमच्यावरील आघात रोखण्यासाठी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
नवी मुंबई : पोलिसांनी दिलेल्या खोट्या ‘ना हरकत’ अहवालाच्या आधारे सानपाडा येथे एका संस्थेला मशीद बांधण्यासाठी देण्यात आलेला भूखंड रहित करावा, यासाठी २७ नोव्हेंबर या दिवशी मोर्चा, मुंबई-पुणे महामार्गावर चक्का जाम, सामूहिक मुंडन यांसह १४ हिंदूंनी आत्मदहन करण्याची चेतावणी दिली आहे. ही माहिती अखिल सानपाडा रहिवासी महासंघाचे सचिव घन:श्याम पाटे यांनी २४ नोव्हेंबरला पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी घन:श्याम पाटे पुढे म्हणाले, ‘‘तंजीमुल मुस्लिम सोसायटी या संस्थेने सानपाडा येथे वर्ष २००१ पासून मशीद बांधण्यासाठी भूखंड मिळावा; म्हणून सिडकोकडे मागणी केली होती. तेव्हापासून हे आंदोलन चालू आहे. वर्ष २०१६ मध्ये सानपाडावासियांनी सिडकोच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर या संस्थेने त्या भूखंडावर मशीद बांधण्यासाठी अनुमती मिळावी; म्हणून दुसर्यांदा न्यायालयात धाव घेतल्यावर महापालिकेला याविषयी निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. सानपाडा विभागात मुसलमानांची केवळ ५९ कुटुंबे आहेत. तरीही नागरिकांचा विरोध डावलून शांतता बिघडवण्यासाठी येथे मशीद बांधण्याची अनुमती मागितली जात आहे.
आता महापालिकेने तरी जनभावना लक्षात घेऊन बांधकामास अनुमती देऊ नये आणि हा भूखंड रहित करण्यात यावा, या मागणीसाठी २७ नोव्हेंबर यादिवशी उग्र आंदोलन करण्यात येणार आहे.’’
या पत्रकार परिषदेत पाटे यांनी ‘वर्ष २००१ पासून सानपाडावासियांचा या मशिदीच्या विरोधात कसा लढा चालू आहे’, याविषयी सविस्तर माहिती दिली.
वाशी येथे आयोजित पत्रकार परिषदेत महासंघाचे अध्यक्ष कैलास ताजणे, सदस्य संतोष पाचलग, मिलिंद सूर्यराव, रामचंद्र पाटील, मंदाकिनी कुंजीर आदी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात