Menu Close

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटावर बंदी घाला : हिंदूंची मागणी

पुणे : ‘केदारनाथ’ या आगामी हिंदी चित्रपटाचे नाव, पोस्टर, ‘ट्रेलर’ आणि ‘टीझर’ यांतून हा चित्रपट हिंदुद्रोही असल्याचे दिसून येते. श्रीक्षेत्र केदारनाथ येथे वर्ष २०१३ मध्ये आलेल्या जलप्रलयाची घटना ही कथित प्रेमप्रकरणाला विरोध केल्यामुळे घडली, असा जावईशोध या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. तसेच या चित्रपटाच्या ‘पोस्टर्स’वर ‘लव्ह इज अ पिलग्रिमेज’ अर्थात ‘प्रेम ही तीर्थयात्रा आहे’ अशी ‘टॅगलाईन’ देत हिंदूंच्या तीर्थयात्रांच्या उद्देशालाच हरताळ फासण्यात आला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटात हिंदूंच्या तीर्थस्थळी एका घोडेवाल्याचे काम करणार्‍या मुसलमान युवकाचे आणि सधन कुटुंबातील हिंदु युवतीचे प्रेमप्रकरण दाखवले आहे. त्यामुळे या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’ला एकप्रकारे प्रोत्साहन देण्याचाच प्रकार करण्यात आला आहे. हे अतिशय निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. मुसलमानांच्या मक्का-मदिना या प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी मुसलमान युवती आणि हिंदु युवक यांची प्रेमकथा दाखवण्याचे धाडस निर्मात्यांनी दाखवले असते का, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीने उपस्थित केला आहे. या चित्रपटाला हिंदु जनजागृती समितीचा तीव्र विरोध असून हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, या चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीसह समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

‘केदारनाथ’ चित्रपटाच्या विरोधात पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन

धार्मिक भावना दुखावल्याविषयी श्रीक्षेत्र केदारनाथ येथील पुजारी आणि भाविक यांनीही केदारनाथ चित्रपटाच्या बंदीची मागणी केली आहे. वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवणे आणि चित्रपटातून कमाई करणे, असा स्वार्थी अन् समाजविघातक हेतू दिसून येतो. त्यामुळे २७ नोव्हेंबरला पुणे शहरातील टिळक चौकात (अलका टॉकीज चौकात) या चित्रपटाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

या वेळी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी विविध घोषणांच्या माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच ‘या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात येऊ नये’, या मागणीचे निवेदनही केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्डाच्या) मुंबई येथील मुख्य कार्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले आहे.

या आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या

१. जनभावनांचा उद्रेक होण्यापूर्वी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने या चित्रपटावर बंदी घालावी.

२. जोपर्यंत चित्रपटातील वादग्रस्त प्रसंग वगळून चित्रपट हिंदु संघटनांच्या किंवा धर्माचार्यांच्या शिष्टमंडळाला दाखवला जात नाही, तोपर्यंत चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.

३. चित्रपटाच्या माध्यमातून हिंदूंची मंदिरे, श्रद्धास्थाने, धर्मग्रंथ आणि देवता यांचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जाऊ नये, यासाठी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने नियमावली बनवावी.

४. चित्रपटाची ‘लव्ह इज अ पिलग्रिमेज’ ही ‘टॅग लाइन’ पालटावी.

वाद निर्माण करून, हिंदूंच्या भावना दुखावून, धर्मपरंपरांवर आघात करून चित्रपट बनवायचा, प्रसिद्धी मिळवायची आणि धंदा करायचा, असे सध्याच्या चित्रपट निर्मात्यांचे अत्यंत नीतीहीन समीकरण बनले आहे, हे वास्तव आहे. वरील मागण्या पूर्ण न करताच चित्रपटाला प्रमाणपत्र दिले गेल्यास होणार्‍या जनउद्रेकास केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आणि सरकार उत्तरदायी असेल, अशीही चेतावणी या आंदोलनातून देण्यात आली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *