Menu Close

सानपाडा येथे मशिदीसाठी दिलेला भूखंड रहित करण्यासाठी ५ सहस्रांहून अधिक हिंदू रस्त्यावर !

धर्मांधांकडून होणार्‍या आघातांच्या विरोधात संघटित होऊन आवाज उठवणार्‍या हिंदूंचे अभिनंदन !

नवी मुंबई : सानपाडा हा हिंदूबहुल भाग असतांनाही गेल्या १७ वर्षांपासून जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मशीद बांधण्याचा हट्ट धर्मांधांकडून चालू आहे. धर्मांधांचे हे षड्यंत्र प्रत्येक वेळी तितक्याच ताकदीने हिंदूंनी उधळून लावले आहे. २७ नोव्हेंबरलाही या षड्यंत्राच्या विरोधात ५ सहस्रांहून अधिक हिंदूंनी रस्त्यावर उतरून मशिदीच्या बांधकामाला दिलेली अनुमती आणि मशिदीसाठी दिलेला भूखंड रहित करण्याची मागणी केली. ही मागणी प्रशासनाने मान्य करावी, यासाठी २७ नोव्हेंबरला हिंदूंनी सकाळी महाआरती करून सानपाडा सेक्टर ८ ते सानपाडा स्थानकासमोरील मुंबई-पुणे महामार्गापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर जोपर्यंत प्रशासन त्यांची मागणी मान्य करत नाही, तोपर्यंत हा महामार्ग रोखून काही वेळ ‘चक्का जाम’ केला. या मोर्च्यात अगदी २ वर्षांच्या मुलांपासून ते ७० ते ८० वयाच्या वयोवृद्ध नागरिकांपर्यंत महिला आणि पुरुष सहभागी झाले होते.  या आंदोलनात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. हिंदूंचा तीव्र विरोध असतांनाही सिडकोने या संस्थेला भूखंड हस्तांतर केल्याच्या निषेधार्थ काही जणांनी मुंडण केले. (हिंदूंनो, अशा कृतींनी सरकारला जाग येणार नाही. यासाठी आजच्याप्रमाणेच तुमच्या संघटितपणाची शक्ती प्रशासन आणि सरकार यांना वेळोवेळी दाखवली, तरच तुमच्या मागण्यांची नोंद घेणे सरकारला भाग पडेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यानंतर महापालिकेचे नगररचनाकार उगिले यांनी मोर्च्याला सामोरे जात निवेदन स्वीकारून ‘याविषयी सकारात्मक निर्णय घेऊ’, असे आश्‍वासन दिले.

संपूर्ण सानपाडा बंद करण्याच्या हिंदु नागरिकांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण परिसरात शुकशुकाट होता. सानपाड्यातील सर्व दुकाने आणि सार्वजनिक वाहतूक बंदी होती. या मोर्च्यानिमित्त संपूर्ण सानपाडा बंद करण्याच्या आवाहनाला उत्स्फूर्तपणे शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

सानापाडा हा हिंदूबहुल भाग असतांनाही वर्ष २००० पासून धर्मांधांची ‘या भागात मशीद बांधण्यासाठी भूखंड मिळावा’, अशी मागणी होती. त्याला वारंवार येथील हिंदूंनी प्रखर विरोध करूनही त्या विरोधाला सरकारने केराची टोपली दाखवत वर्ष २०१२ मध्ये भूखंड मुस्लिम संस्थेला मशिदीसाठी हस्तांतरित करून या मासात महापालिकेने न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे कारण पुढे करत मशीद बांधण्याची अनुमती दिली आहे.

या प्रकरणी महापालिकेचे साहाय्यक संचालक (नगररचना) मोमीन यांना विचारणा केली असता त्यांनी ‘आम्ही केवळ मोर्चेकर्‍यांचे निवेदन स्वीकारून या प्रकरणी पोलिसांचा अभिप्राय मागवला असून तो मिळाल्यावर वरिष्ठांकडे सादर करू’, असे आश्‍वासन दिले.

क्षणचित्रे

१. काल रात्रीपासूनच सानपाडा रेल्वेस्थानक, महामार्ग, सानपाडा परिसरात कडक बंदोबस्त होता.

२. पोलीस प्रत्येक नागरिकाचे चित्रीकरण करत होते.

३. हिंदूंनी भगवे झेंडे हाती धरल्याने वातावरण भगवेमय झाले होते. रस्त्यावरील नागरिकही उत्स्फूर्तपणे घोषणा देत होते.

४. सानपाड्यातील वारकरी संप्रदायाने ‘जय जय रामकृष्णहरि’ या गजराने वातावरण प्रफुल्लीत केले.

५. ‘होणार नाही होणार नाही सानपाड्यात मशीद होणार नाही’, ‘कौन चले रे कौन चले, हिंदु धर्म के वीर चले’, ‘मशीद हटाव सानपाडा बचाव’ अशा शौर्यपूर्ण घोषणांनी संपूर्ण सानपाडा दणाणून गेला.

मोर्चेकर्‍यांनी महापालिकेकडे लेखी आश्‍वासन देण्याची मागणी केली. त्या वेळी पोलिसांनी बळाचा वापर करून १०० जणांना कह्यात घेतले आणि अन्य हिंदूंना कारवाईची धमकी देत महामार्गावरून धमकावून बाजूला केले. (कधी धर्मांधांच्या मोर्च्यात पोलीस असे वागल्याचे पाहिले आहे का ? धर्मांधांच्या मोर्च्यात पोलिसांची काय स्थिती होते, हे सार्‍या जगाने पाहिले आहे. हिंदु तसे करत नाहीत, म्हणून पोलीस वारंवार बळाचा वापर करतात का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *