जामा मशीद पाडण्याविषयी वक्तव्य केल्याचे प्रकरण
भाजपच्या राजवटीत भाजपच्या खासदारांचीच ही अवस्था असेल, तर सर्वसामान्य हिंदूंची काय दशा असेल, याचा विचारच न केलेला बरा !
लक्ष्मणपुरी (लखनौ) : जामा मशीद पाडण्याचे विधान केल्याच्या प्रकरणी एका धर्मांधाने भाजपचे खासदार साक्षी महाराज यांना बॉम्बने उडवण्याची भ्रमणभाषवरून धमकी दिली आहे. साक्षी महाराजांनी याविषयी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून याविषयीची माहिती दिली आणि ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.
या पत्रात साक्षी महाराज यांनी म्हटले आहे, ‘‘मला २६ नोव्हेंरबला दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी एक, तर सायंकाळी ६ वाजून ४९ मिनिटांनी दुसरा, असे २ भ्रमणभाष वेगवेगळ्या क्रमांकांवरून आले आणि बॉम्बने उडवण्याची धमकीही देण्यात आली. भ्रमणभाष करणार्याने स्वतःचे नाव महंमद अन्सारी, असे सांगून तो महाराष्ट्रातील अकोला येथील रहिवासी असल्याचेही सांगितले. यापूर्वी २३ आणि २४ नोव्हेंबर या दिवशीही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.’’
काही दिवसांपूर्वी साक्षी महाराज यांनी ‘जेव्हा मी राजकारणात आलो होतो, तेव्हा माझी पहिली घोषणा होती की, अयोध्या-मथुरा-काशी सोडा, देहलीची जामा मशीद पाडा. ही मशीद पाडल्यानंतर तेथे हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती सापडल्या नाहीत, तर मला फसावर लटकवा’, असे विधान केले होते. तेव्हापासून त्यांना धमक्या मिळत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात