कल्याणजवळील ताबोर आश्रम धर्मांतराचे मुख्य केंद्र असल्याचे उघड !
- हिंदुत्वनिष्ठाकडून रेल्वे प्रशासनास निवेदन !
- कल्याण परिसरात ख्रिस्ती प्रचारकांचा सुळसुळाट !
कल्याण : येथील पूर्वेला रहाणार्या श्री. अनिल तिवारी या हिंदुत्वनिष्ठाने उपनगरीय रेल्वेतून होणारे ख्रिस्ती पंथाचा अनधिकृत प्रसार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनास २० नोव्हेंबरला ‘बौद्धिक सेवा संस्था’ यांच्या वतीने निवेदन दिले आहे; मात्र अद्याप रेल्वे पोलिसांनी किंवा प्रशासनाने त्यावर काही कार्यवाही केलेली नाही.
१. श्री. अनिल तिवारी हे काही कामानिमित्त मुंबईहून कल्याणला येत होते. त्या वेळी अपंगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात एक पत्रक लावलेले त्यांनी पाहिले. (धर्मांतर करण्यासाठी नित्य नवे प्रयोग करणारे कावेबाज ख्रिस्ती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. या पत्रकावर क्रॉस आणि येशू यांविषयीची काही वाक्ये होती. ‘येशूवर सर्वांनी प्रेम करा. येशूला सर्वस्व अर्पण करा. येशूचे नाव घेतल्याने अंधांना दृष्टी येते, अपंग चालायला लागतात आणि कोडही येशूच्या नामस्मरणाने नष्ट होते.’ (केवळ हिंदूंच्या धर्मश्रद्धांवर घाला घालणार्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे यावर काय म्हणणे आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘येशूच्या सान्निध्यात आल्याने तुमचे दुःख, दारिद्य्र दूर होईल’, असा दावाही या पत्रकात केला होता.
३. या पत्रकात यासंदर्भात अधिक माहिती आणि प्रार्थना करण्यासाठी ८२९१५८४२२८८/९७६९०९४४२८ असे दोन संपर्क क्रमांक लिहले होते. श्री. अनिल तिवारी यांनी यांतील ८२९१५८४२२८८ या क्रमांकावर संपर्क केला असता तो रवी पाटील नामक व्यक्तीने उचलला. श्री. अनिल तिवारी आणि रवी पाटील यांच्या संभाषणात काही धक्कादायक माहिती समोर आली.
४. रवी पाटील म्हणाले, ‘‘मी हिंदु कोळी असून मी सध्या केवळ येशूच्या वचनांचा प्रचार, प्रसार करत आहे. या भूतलावर केवळ येशू हा एकमेव देव आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना मी देव मानत नाही. रुग्णालयात उपचारासाठी असतांना मला केवळ येशूने वाचवले म्हणून मी त्याचा झालो. तुम्हीही गणपति, श्रीराम, श्रीकृष्ण अशा संख्येने पुष्कळ असणार्या देवतांची पूजा करू नका. तुम्ही कल्याणजवळ असलेल्या ताबोर आश्रमात जा. तेथे तुमची सर्व दुःखे दूर होतील’’, असा सल्ला रवी पाटील यांनी तिवारींना दिला.
५. तिवारी यांनी रवी पाटील यांना ‘‘तिकडे एक दिवस गेलो तर चालेल का ?’’, प्रश्न केल्यावर असा प्रश्न विचारल्यावर ‘‘तुम्हाला ताबोर आश्रमातून तीन दिवस बाहेर सोडणारच नाहीत’’, असे रवी पाटील यांनी सांगितले. या संभाषणाचे ध्वनीमुद्रण पुरावा सनातन प्रभातच्या प्रतिनिधीकडे उपलब्ध आहे. (याचा अर्थ या आश्रमात ख्रिस्ती हिंदूंना डांबून ठेवून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणतात किंवा त्यांना धमकावतात किंवा त्यांच्यावर काही अनिष्ट प्रयोग करतात, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
६. वरील सर्व सूत्रांवरून श्री. अनिल तिवारी यांना हा प्रकार हिंदूंना धर्मांतरीत करण्याचे मोठे षड्यंत्रच असल्याचे लक्षात आले.
७. श्री. अनिल तिवारी यांनी या संदर्भात क्षेत्रीय व्यावस्थापक, रेल्वे (मुंबई); आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल; कल्याण रेल्वे सुरक्षा बल आणि कल्याण लोहमार्ग पोलीस यांच्याकडे अशा प्रकारचे अनधिकृतपणे पत्रक लावणार्या व्यक्ती आणि संस्था यांवर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे. वरील ठिकाणी निवेदने देऊन सहा दिवस झाले; मात्र कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. याविषयी रेल्वे सुरक्षा बलाचे कल्याणचे अधिकारी श्री. माने यांना सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी ‘तपास चालू आहे’, असे पोलिसी खाक्याचे उत्तर दिले.
८. याविषयी श्री. अनिल तिवारी यांच्याशी सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता कल्याणपासून ७ कि.मी. अंतरावर असलेल्या कांबा गावाजवळ ताबोर आश्रमात मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याचे समजले. ख्रिस्त्यांचा हा तथाकथित आश्रम म्हणजे महाराष्ट्र्रातील धर्मांतराचे हे सर्वांत मोठे केंद्र असल्याचेही त्यांनी सांगितले. याविषयी कठोर कारवाई होण्यासाठी लढा देणार असल्याचे तिवारी म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात