- एकामागोमाग एक हिंदुविरोधी चित्रपटांना अनुमती देणार्या केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचा हिंदुद्वेष जाणा !
- केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ कोट्यवधी हिंदूंचा विरोध डावलून ‘पद्मावत’, ‘केदारनाथ’ यांसारख्या हिंदुविरोधी चित्रपटांना अनुमती देते आणि भाजप सरकार त्यात हस्तक्षेपही करत नाही, हे लक्षात घ्या !
- हिंदूंना धर्महिताच्या रक्षणासाठी अशा याचिका काँग्रेसच्या काळातही कराव्या लागत होत्या आणि भाजप सरकारच्याही काळात कराव्या लागत आहेत. यावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात थोडाही भेद नाही, हे सिद्ध होते !
कर्णावती (गुजरात) : लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटाच्या विरोधात ‘आंतरराष्ट्रीय हिंदु सेने’ने गुजरात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. (अशी याचिका प्रविष्ट करावी लागणे, हे भाजप सरकारला लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. या याचिकेत ‘आंतरराष्ट्रीय हिंदु सेने’ने म्हटले आहे की, हा चित्रपट ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारा आहे. केदारनाथ हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. अशा पवित्र ठिकाणी चित्रपटातील नायक-नायिकेचे चुंबनदृश्य दाखवणे चुकीचे आहे. या चित्रपटामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या चित्रपटात सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान अन् सुशांतसिंह राजपूत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘केदारनाथ’ चित्रपटाचे प्रसिद्ध झालेले विज्ञापन पाहिल्यानंतर उत्तराखंडातील केदारनाथ मंदिरातील पुजार्यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला. हा चित्रपट हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा असून ‘सरकारने त्यावर बंदी घालावी’, अशी त्यांनी मागणी केली होती. यानंतर भाजपचे नेते अजेंद्र अजय यांनीही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात