नांदेड : शबरीमला, तसेच महाराष्ट्रातील मंदिरांतील धर्मपरंपरांचे रक्षण करावे, त्यासाठी संसदेत कायदा करावा आणि धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी आंदोलन करणार्या भक्तांवरील गुन्हे मागे घ्यावेत, तसेच ननवर १३ वेळा बलात्कार केल्याचा आरोप असणारे बिशप फ्रॅन्को मुलक्कल यांचा जामीन रहित करून कठोर शिक्षा व्हावी, या मागण्यांसाठी २९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदुत्वनिष्ठांकडून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर या विषयांवर केंद्रीय गृहमंत्री, तसेच मुख्यमंत्री यांना देण्यासाठी नांदेड येथील निवासी उपजिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
नांदेड येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांकडून धर्मपरंपरांचे रक्षण करण्याची मागणी !
Tags : ख्रिस्तीमंदिरे वाचवाराष्ट्रीय हिंदु आंदोलनशबरीमलाहिंदु जनजागृती समितीहिंदु विराेधीहिंदु संघटना आणि पक्षहिंदूंचा विरोधहिंदूंच्या समस्या