मोई (ता. खेड, जिल्हा पुणे) : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वर्ष १९७६ मध्ये राज्यघटनेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घुसडून देशाला ‘धर्मनिरपेक्ष’ केले. या ‘धर्मनिरपेक्ष’ व्यवस्थेमुळेच इतके वर्षे झाली, तरी अद्याप श्रीरामजन्मभूमीत प्रभु श्रीरामांचे मंदिर उभे राहू शकत नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आणि मोई ग्रामस्थ यांच्या वतीने २४ नोव्हेंबरला मारुति मंदिरात येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
‘धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेमुळे हिंदूंच्या प्रथा-परंपरा संकटात आल्या असल्याचेही त्यांनी उदाहरणे देऊन स्पष्ट केले. शनिशिंगणापूर आणि आता शबरीमला देवस्थान येथे जाणीवपूर्वक हिंदूंच्या प्रथा-परंपरा बंद पाडण्याचा घाट घातला जात आहे. त्याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे आवश्यक आहे’, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध करा ! – नागेश जोशी
मागील वर्षी मोशी येथे होऊ घातलेल्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला मोशीसह मोई येथील ग्रामस्थांनीही विरोध केला होता. यंदाच्या वर्षीही या विकृत कार्यक्रमाला सनदशीर मार्गाने विरोध करावा, असे आवाहनही श्री. नागेश जोशी यांनी केले.
क्षणचित्रे
१. श्री. नागेश जोशी यांनी व्याख्यानाच्या वेळी कुलदेवतेच्या नामस्मरणाचे महत्त्व सांगितले. हा विषय सर्वांना विशेष करून आवडला.
२. सभेच्या शेवटी हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कार्यरत रहाण्याची शपथ घेण्यात आली, तेव्हा एका व्यक्तीच्या गुडघ्याला मार लागलेला असतांनाही त्यांनी उभे राहून शपथ घेतली.
३. कु. प्रथमेश येवले (वय १० वर्षेे) याने दिवसभर धर्मप्रेमींसह सभेची सेवा केली.
४. धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांनी सभा होणार असलेले मंदिर स्वच्छ केले.