आपत्काळात नागरिकांच्या रक्षणासाठी प्रथमोपचार शिकणे, ही काळाची आवश्यकता : सद्गुरु सत्यवान कदम
खेड : आगामी काळ हा भीषण आपत्तींचा असणार आहे. पूर, भूकंप, अग्नीप्रलय, ज्वालामुखी अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, तसेच दंगली, अणूबॉम्ब स्फोट, जाळपोळ अशा मनुष्यनिर्मित आपत्तीही उद्भवणार आहेत. यामध्ये स्वत:च्या जीवित रक्षणासाठी, तसेच कुटुंबाच्या, समाजाच्या पर्यायाने राष्ट्रातील नागरिकांच्या रक्षणासाठी प्रथमोपचार शिकून सिद्ध होणे, ही काळाची आवश्यकता आहे आणि सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. तालुक्यातील आयनी-मेटे तपोधाम येथे २५ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘प्रथमोपचार’ शिबिरामध्ये ते बोलत होते. या शिबिराचा लाभ ६० जणांनी घेतला.
शिबिराचा उद्देश श्री. महेंद्र चाळके यांनी सांगितला. ‘मूलभूत जीवितरक्षण साहाय्य’ या विषयावर डॉ. (सौ.) साधना जरळी यांनी दृकश्राव्य माध्यमातून शिबिरार्थींना माहिती सांगितली, तसेच ‘रक्तस्राव’ याविषयावर सौ. जोत्स्ना नारकर यांनी माहिती सांगितली. यासह ‘रुग्ण पडताळणी कशी करावी ?’, ‘मर्माघात झालेल्या रुग्णावर प्रथमोपचार कसे करावेत?’, रुग्णाला वाहून नेण्याच्या विविध पद्धती याविषयीचे गटांमध्ये प्रात्यक्षिके घेण्यात आली.