हिंदु जनता सभा आणि धर्माभिमानी यांची अधिवक्त्यांच्या वतीने केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला नोटीस !
मुंबई : मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी यांचे प्रेमप्रकरण दाखवून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्या ‘केदारनाथ’ या चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र रहित करावे, यासाठी येथील हिंदु जनता सभा आणि धर्माभिमानी श्री. अमित सावंत यांनी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्डाला) अधिवक्ता श्री. मनोजकुमार उपाध्याय यांच्यावतीने नोटीस पाठवली आहे.
या नोटिसीमध्ये म्हटले आहे की,
१. ‘केदारनाथ’ चित्रपटाचे विज्ञापन (ट्रेलर) प्रसिद्ध झाले आहे. तेथे कोणीही मुसलमान रहात नसूनही, मंदिरामध्ये मुसलमान तरुण हिंदु तरुणीसह दाखवला आहे.
२. केंद्र सरकार ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’, अशी योजना आखते. या चित्रपटात हिंदु वडील त्यांच्या मुलीला मारतांना दाखवले आहे. त्यामुळे सरकारच्या मुलगी वाचवण्याच्या योजनेला सुरुंग लागला आहे.
३. मुसलमान तरुण हिंदु युवतीच्या प्रेमात पडला असल्याचे चित्रपटात दाखवल्यामुळे मुसलमान तरुणांकडून त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न होणार आहे. यामुळे हिंदु तरुणींना पळवून त्यांचे धर्मांतर करण्याच्या ‘लव्ह जिहाद’ या प्रकाराला चालना मिळणार आहे.
४. मोक्षपुरीधाम म्हणून केदारनाथ हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. या पवित्र ठिकाणी हिंदु तरुणी तिची सेवा करणार्या मुसलमान मुलाच्या प्रेमात पडल्याचे दाखवून मंदिराचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला आहे.
५. ‘लव्ह जिहाद’च्या घटना समाजात घडत असल्याच्या बातम्या दैनिकात नेहमी छापून येत असतात. या पार्श्वभूमीवर चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याआधी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने हिंदु समाजाचे मत विचारात घेतलेले नाही.
६. हिंदु-मुसलमान प्रेमकथा दाखवणार्या या चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रसंग घुसडलेले असल्याने या चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र रहित करावे.
या पत्राची प्रत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांना पाठवली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात