लातूर : विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या हिंदुत्वनिष्ठांवर कथित आरोप होऊन त्यांना पोलिसांकडून नाहक मारहाणही होते. या अन्यायामुळे ते पुन्हा हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी धजावत नाहीत. धर्मविरांच्या मनोबलाचे खच्चीकरण होऊ नये, यासाठी अधिवक्तेच त्यांना योग्य साहाय्य करू शकतात. धर्माभिमानी अधिवक्त्यांनी धर्मविरांचे संरक्षककवच बनावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, गुजरात आणि कोकण विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. अधिवक्ता पुरुषोत्तम नावंदर यांनी सर्व अधिवक्त्यांनी धर्मासाठी आपापल्या परीने योगदान द्यावे, याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी येथील अधिवक्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी श्री. मनोज खाडये बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर, लातूर आणि बीड जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांसह २१ अधिवक्ते उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. अधिवक्ता श्रीनिवास मातोळकर आणि अधिवक्ता रवि पिचोरे यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना प्रसारमाध्यमांतून होणार्या अपप्रचाराच्या विरोधात न्यायालयीन साहाय्य करण्याचे निश्चित केले.
२. अधिवक्ता ऋषिकेश देशपांडे यांनी धर्मशिक्षणवर्गाची मागणी केली.